आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या ताब्यावरून सुरू असलेल्या वादात १९ जून रोजी दोन्ही गटात तुफान हाणामारी व दगडफेक झाली होती. दरम्यान, आता जिल्हापेठ पोलिसांनी आता सीआरपीसी १४५ प्रमाणे फेरप्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही गटातील संचालक, सदस्यांना मविप्रच्या कार्यालयात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
धर्मदाय व सहकाय अशा दोन्ही स्वतंत्र कायद्यानुसार नरेंद्र पाटील व भोईटे गटाने संस्थेवर ताबा असल्याचा दावा केला आहे. त्यावरुन १७ फेब्रुवारी रोजी दोन्ही गट समोरा-समोर भिडले होते. या वादामुळे २५ फेब्रुवारी जिल्हापेठ पोलिसांनी दोन्ही गटांना कार्यालयात येण्यास बंदी घातली होती. पोलिसांनी पाठवलेल्या सीआरपीसी १४५च्या प्रस्तावावर तहसीलदार अमोल निकम यांच्यासमोर सुनावणी झाली होती.
गुन्ह्याच्या चौकशीचे न्यायालयाचे निर्देश
हाणामारीच्या गुन्ह्यात दोन्ही गटातील सुमारे ४० जणांवर गुन्हा दाखल आहे. यातील काहीजण घटनेच्यावेळी मविप्रच्या परिसरात नसून आपापल्या कामानिमित्त इतरत्र होते, असे अटकपूर्व जामिन अर्जावर युक्तीवाद करताना संशयितांच्या वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यानुसार गुन्ह्याची चौकशी करून, सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांवर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात अालेले अाहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.