आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री महाजनांचे नेतृत्व मान्य, पण भाजप-खाविअा युतीला विराेध; खडसेंचे परखड मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेली अनेक वर्षे अापण ज्या प्रवृत्तीविराेधात लढत अाहाेत, अाता त्यांच्यासाेबत युती करून लढणे मनाला पटत नाही. लढण्याचा अाणि नेतृत्वाचाही वाद नाही. अापण जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वातही जळगाव महापालिका निवडणुकीचे काम करण्यासाठी तयार अाहाेत. मात्र, युतीबाबत मनाची तयारी नसल्याचे परखड मत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बाेलताना मांडले. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी महापाैर भाजपचाच हाेईल, असे सूताेवाच करत युतीचे संकेत दिले. त्या अाधी सुरेश जैन यांनीही युती संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सांगितले. त्यामुळे युतीबाबत वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाल्याने युतीचे त्रांगडे झाले अाहे. 


जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी अामदार सुरेश जैन यांनी गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन युतीसंदर्भात चर्चा केल्याचे वृत्त माध्यमांनी प्रकाशित केले. त्यामुळे भाजपत खळबळ उडाली. माजी मंत्री एकनाथ खडसे हे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता जळगाव येथील निवासस्थानी येताच भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेऊन अापल्या भावना व्यक्त केल्या. खान्देश विकास अाघाडी साेबत युती नकाेच. युती लादण्याचा प्रयत्न केल्यास स्वतंत्र अाघाडी करून लढण्याच्या संतप्त भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. या वेळी त्यांनी काही पदाधिकारी, समर्थक यांची बैठक घेतली. बैठकीनंतर कार्यकर्त्यांना शांत करुन अामदार खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


कार्यकर्त्यांनाच नव्हे जनतेलाही मान्य नाही 
केंद्रात अाणि राज्यात सत्ता नसताना जळगाव शहरात भाजपचा लाेकनियुक्त नगराध्यक्ष हाेता. अाता तर भाजपची सत्ता असल्याने लढत अाणखी साेपी अाहे. भाजप-खाविअा ही युती कार्यकर्त्यांनाच काय जनतेलाही मान्य नाही. अनेक सामान्य नागरिक फाेन करून जाब विचारत अाहेत. माझा नेतृत्वाचा वाद नाही. भाजपने निवडणूक गिरीश महाजनांच्या नेतृत्वात लढवली. तरी त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचे खडसे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...