आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंच्या पराभवाशिवाय भांग पाडणार नाही; काँग्रेसच्या बैठकीत अामदार अब्दुल सत्तार यांची प्रतिज्ञा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- येत्या लाेकसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा किमान १ लाख मतांनी पराभव केल्याशिवाय मी भांग पाडणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतल्याचे अामदार अब्दुल सत्तार यांनी काॅग्रेसच्या बैठकीत जाहीर केले. येत्या लाेकसभा निवडणुकीत अापले दानवे एके दानवे एेवढेच ध्येय राहणार असल्याचे अामदार सत्तार यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. 


जळगाव महानगरपालिका निवडणूक लढताना येथील स्थानिक नेत्यांमध्ये अात्मविश्वासाची कमी अाहे. शहरातील नेत्यांना अात्मविश्वास कसा असावा याचे उदाहरण देण्यासाठी अामदार सत्तार यांनी स्वत:च्या भीष्मप्रतिज्ञेचा उल्लेख केला. सर्वत्र भाजपची सत्ता असताना मी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा १ लाख मतांनी पराभव करण्याची प्रतिज्ञा केली अाहे. लाेक मला वेड्यात काढत असले तरी त्यामागे माझा अात्मविश्वास पक्का असून अात्मविश्वसाच्या बळावर मी माझे ध्येय पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. दानवेंच्या पराभवाशिवाय भांग पाडणार नाही. गेल्या दहा महिन्यापासून मी डाेक्यावर केसच उगवू नये म्हणून दर पंधरवाड्याला हजामत करीत असून डाेक्यावर गांधी टाेपी घालत असल्याचे ते म्हणाले, लाेकसभा निवडणुकीचा निकाल लागेल, त्या दिवशी दानवे यांचा १ लाख मतांनी पराभव करणार असल्याची प्रतिज्ञा केली. 


मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमुळेच काढला खडसेंचा काटा 
सध्याच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांवर एकनाथ खडसे यांच्यापेक्षाही गंभीर अाराेप अाहेत. खुद्द मुख्यमंत्री गब्बरसिंग अाहेत. अाराेप असलेल्या इतर मंत्र्यापासून धाेका नसल्याने त्यांच्यावर काेणतीही कारवाई करण्यात अालेली नाही. परंतू, एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री पदासाठी पर्यायी स्पर्धक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरील अाराेप सिद्ध झालेले नसतांना त्यांचा राजीनामा घेवून त्यांना बाजुला सारल्याचा अाराेप काॅग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, मुख्यमंत्र्याच्या नागपूर शहरामध्ये सातत्याने हाेत असलेल्या खुनांचा उल्लेख करीत त्यांनी गृहमंत्री फेल ठरत असल्याचा अाराेप केला. यावेळी जिल्हा प्रभारी विनायक देशमुख, डाॅ.हेमलता पाटील, डाॅ. उल्हास पाटील, अॅड.संदीप पाटील, डी जी पाटील, डाॅ. ए जी भंगाळे, डाॅ.राधेशाम चाैधरी, उदय पाटील उपस्थित हाेते. 

 

बातम्या आणखी आहेत...