आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येकाने किमान एक नगरसेवक निवडून अाणा, तरच काँग्रेस भवनाची पायरी चढा! -अब्दुल सत्तार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील प्रत्येक काँग्रेस नेत्याने एक प्रभाग दत्तक घ्यावा, शहरात राहणाऱ्या प्रत्येक नेत्यांनी स्वत:च्या घरातील सदस्याला उमेदवारी द्यावी, किमान अाता व्यासपीठावर असलेल्या २० नेत्यांनी किमान एक नगरसेवक निवडून अाणल्याशिवाय काँग्रेस भवनाची पायरी चढणार नाही, असा संकल्प करण्याचे अावाहन काँग्रेसचे माजी मंत्री तथा अामदार अब्दुल सत्तार यांनी केले. दरम्यान, काेणत्याही एका प्रभागाची जबाबदारी घेऊन अापण चार नगरसेवक निश्चित निवडून अाणणार असल्याचा विश्वास अामदार सत्तार यांनी केली. 


जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अागामी २१ जून राेजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेसचा मेळावा अायाेजित करण्यात अाला अाहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसची अामदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत अाढावा बैठक घेण्यात अाली. या बैठकीत खच्चून भरलेल्या व्यासपीठावरील २० जिल्हा नेते म्हणवणाऱ्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी नावे घेतली. यात व्यासपीठावरील प्रत्येक नेत्याने जिल्हा नेता म्हणून मान्यता मिळवण्यासाठी अाधी शहरातील वाॅर्डात अापली कामगिरी करण्याचे अावाहन अामदार सत्तार यांनी केले. 


जिल्हा अाणि प्रदेशावर नेते असणाऱ्यांना शेजारी अाेळखत नाहीत, साधे नगरसेवक म्हणून निवडून येण्याची पात्रता नसणारेदेखील स्वत:ला नेते म्हणून मिरवत असतात. ही स्वत:सह पक्षाचीदेखील माेठी फसवणूक अाहे. अशा नेत्यांनी दिल्लीची चिंता करण्याचे कारण नाही, तुम्ही तुमची गल्ली सांभाळली तरी पुरे अाहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत व्यासपीठावरील प्रत्येक नेत्याने अापापल्या साेईचे प्रभाग दत्तक घेण्यासाठी पक्षाकडे नावे द्यावीत. जिल्हा नेत्यांनी अाधी वाॅर्डाचे नेते हाेऊन स्वत: सिद्ध करावे, असे अाव्हान त्यांनी नेत्यांना दिले. दरम्यान, बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या निवडणुकीचे नियाेजन सांगितले. या वेळी जिल्हा प्रभारी विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. उल्हास पाटील, राजू वाघमारे, माजी अामदार शिरीष चाैधरी, डी. जी. पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, महानगर अध्यक्ष डाॅ. ए. जी. भंगाळे, कार्याध्यक्ष डाॅ. राधेश्याम चाैधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. 


जळगावात पक्षाचा एकही नगरसेवक नाही 
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. परंतु या निवडणुकीत मी बाेहणी करून देईल. काेणताही प्रभाग मी दत्तक घेत तेथून ४ नगरसेवक निश्चितच निवडून अाणणार अाहे. माझ्या चार नगरसेवकांचा अाकडा गृहित धरून पुढची जबाबदारी इतर नेत्यांनी अापल्या खांद्यावर घ्यावी. किमान २० नेत्यांनी स्थानिक पातळीवर प्रत्येकी एक नगरसेवक निवडून अाणण्याची जबाबदारी घ्यावी, जेथे कमी पडाल, तेथे मी थांबेल, असे सांगत अामदार सत्तार यांनी कार्यकर्त्यांचा अात्मविश्वास वाढवला. मी फाटका माणूस असूनही अामदार हाेऊ शकलाे, जळगावमध्ये तर कुणी शिक्षण सम्राट तर कुणी सहकार सम्राट असल्याने ताकद माेठी असल्याचे अामदार सत्तार या वेळी म्हणाले. 


नेतेपद सिद्ध करण्यासाठी प्रभाग दत्तक घ्या 
प्रत्येक नेत्याने स्वत:चे नेतेपद सिद्ध करण्यासाठी प्रभाग दत्तक घेऊन किमान एक नगरसेवक निवडून अाणावा. शक्यताेवर स्वत:च्या कुटुंबातील, नात्यातील लाेकांना उमेदवारी द्यावी, त्यांना निवडून अाणण्यासाठी सर्व ताकद लावा. जेवढे नगरसेवक निवडून अाणाल त्यावरच तुमच्या नेतेपदाची वर्गवारी हाेईल. जिल्हा, प्रदेश अाणि अखिल भारतीय पातळीवरील नेते म्हणवण्यापेक्षा यापुढे जळगाव महापालिकेत दाेन नगरसेवक निवडून अाणणारा, चार नगरसेवक निवडून अाणणारा, अशी नेत्यांची वर्गवारी करता येईल. काेणत्याही नेत्याने किमान एक नगरसेवक निवडून अाणल्याशिवाय काँग्रेस भवनाची पायरीच चढू नये, असे अावाहन अामदार सत्तार यांनी व्यासपीठावरील नेत्यांना केले. 


लाज वाटली तरच बदल शक्य : राजू वाघमारे 
एकही नगरसेवक नसलेल्या जळगावचे तुम्ही नेते अाहात; हे सांगताना नेत्यांना लाज वाटत नाही, ताेपर्यंत महानगरपालिकेत राजकीय बदल शक्य हाेणार नाही. संपूर्ण जागा लढवूनदेखील एकही नगरसेवक निवडून येऊ शकत नाही, ही येथील नेत्यांसाठी लाज वाटण्याचीच गाेष्ट अाहेत. परंतु त्याची लाज वाटत नसल्यानेच पक्षाला यश येत नसल्याचे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे या वेळी म्हणाले. शहरातील प्रत्येक नेत्याने अापापल्या प्रभागातील मतदार यादीचा अभ्यास करावा, अापल्या शेजारचे तसेच संबंधांमधील लाेकांशी संबंध वाढवण्याचे अावाहन राजू वाघमारे यांनी केले. निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी अवलंबले जाणारे सुत्र, वेळेचे नियाेजन याची माहिती त्यांनी दिली. 


नेत्यांत बेकी, कार्यकर्ते काडी करणारे 
जळगाव जिल्हा काॅंग्रेसमध्ये अात्मविश्वासाची कमी अाहे. नेत्यांमध्ये 'एकी' नसून 'बेकी' अाहे. 'नेते अधिक अाणि कार्यकर्ते कमी,' अशी येथील काँग्रेसची स्थिती अाहे. जे कार्यकर्ते अाहेत, त्यातील बरेच कार्य कमी अाणि काड्याच अधिक करतात, त्यामुळे पक्षाचा बालेकिल्ला ढासळला अाहे. नेत्यांच्या ताेंडी निवडून येण्याएेवजी पाडापाडीचीच भाषा अधिक अाहे. विराेधकांवर बाेलण्यापेक्षा पक्षाचे नियाेजन बारकाईने करावे. भाजपची चिंता करू नका, माेगलाई गेली, पेशवाई गेली, ब्रिटीश ही गेले, तशीच भाजपही जाईल, कधीच कुणाकडे कायमची सत्ता राहत नसल्याचे अामदार सत्तार या वेळी म्हणाले. अामदार सत्तार यांच्या नावे अागे बढाे म्हणणाऱ्या नेत्यांना थांबवत सत्तार यांनी मी अाधीच खूप पुढे गेलाे अाहे, अाता तुम्ही पुढे या, असे म्हणत थांबवले. गटबाजी करणाऱ्यांनी पक्षाची पायरीच चढू नका, अशा शब्दात त्यांनी खडसावले. 
काॅंग्रेस भवनात शुक्रवारी अायाेजित करण्यात अालेल्या बैठकीत राजू वाघमारे यांनी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अापली भूमिका परखडपणे मांडली. त्यांनी अतिशय सूक्ष्म विषयांना हात घालून उपस्थित कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...