आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाडा हत्याकांड : २३ अाराेपी पाेलिस काेठडीत; मृतांच्या वारसांना सरकारी नाेकरी; ५ लाखांची मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राईनपाडा हत्याकांड : २३ अाराेपी पाेलिस काेठडीत; मृतांच्या वारसांना सरकारी नाेकरी; ५ लाखांची मदत
प्रतिनिधी
धुळे- साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात पाेरधरी असल्याच्या संशयावरून पाच जणांची रविवारी जमावाकडून हत्या करण्यात अाली हाेती. या प्रकरणातील अाराेपींना अटक करून कठाेर शिक्षा हाेईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतांच्या कुटुंबीयांनी घेतली हाेती. मात्र, जिल्हा प्रशासनाने सुमारे दीड तास चर्चा करत त्यांची समजूत काढली. प्रत्येक मृताच्या वारसांना मदत, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नाेकरी व भिक्षुक समाजाला संरक्षण देण्याचे लेखी अाश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले, तर मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची अार्थिक मदत देण्याची घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये केली. 


प्रशासनाच्या लेखी अाश्वासनावर समाधान झाल्यानंतर पाचही पीडित कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतले. या सर्वांना तीन रुग्णवाहिकांमधून मृतदेहांसह त्यांच्या मूळ गावी मंगळवेढ्याकडे पाठवून देण्यात अाले. त्यानंतर सायंकाळी पिंपळनेरनजीक वस्तीला असलेल्या या कुटुंबीयांच्या नातलगांनी त्यांचा झाेपड्यांमधील संसार गुंडाळून ट्रकमधून गावाकडे नेला. दरम्यान, पाच जणांची हत्या करणाऱ्या जमावापैकी २६ जणांना पाेलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची काेठडीही सुनावली अाहे. रविवारी झालेल्या या भीषण हत्याकांडानंतर संपूर्ण गावच सुन्न झाले हाेते. साेमवारीही राईनपाड्यात अघाेषित संचारबंदी हाेती. 


या मागण्या मंजूर 
- अाराेपींवर कठाेर कारवाई हाेणार, एसअायटीद्वारे चाैकशी  
- गुन्ह्यात सरकार पक्षाची बाजू अॅड. उज्ज्वल निकम मांडणार  
- मृतांच्या वारसांना सानुग्रह मदत व शासकीय नोकरीत समावेश  
- राज्यात भिक्षेसाठी कोणत्याही जिल्ह्यात गेलेल्या गोसावी समाजाला स्थानिक पातळीवर पोलिस मदत  
- संबंधित घटना ज्या ग्रामपंचायत कार्यालयात घडली येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करणार 


राईनपाडा गावाला शाप 
अत्यंत निर्दयी हत्या झाल्याने हतबल झालेले पाच जणांच्या कुटुंबीयांचा अाक्राेश थांबत नव्हता. गाव साेडून जातानाही 'अाता जगून काहीच फायदा नाही' अशा भावना ते व्यक्त करत हाेते. आमच्या माणसांना मारल्याने या गावातील नागरिक कधीही सुखी राहणार नाही व तेथे पाऊसही कधी पडणार नाही, असा शाप या कुटुंबातील महिला देत हाेत्या. 

 

सोशल मीडियामुळे झाली हत्या
रविवारी राईनपाडा येथे पाच निर्दोष भिक्षुकरींची हत्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खोट्या संदेशामुळे झाली असून तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाचा वापर करतांना प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणे आवश्यक आहे.

 

स्थानिकांचा मदतीचा हात
यावेळी पिंपळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते भटू पवार, रोहिदास पगारे,प्रकाश साळवे, युनूस तांबोळी, युनूस खाटीक या लोकांनी पिंपळनेर मधून पंधरा हजार रूपये पेक्षा जास्त पैसे जमा करून आर्थिक मदत केली. तसेच धुळे येथील बाप्पा सेल्सचे उमेश महाजन व प्रशांत बागूल यांनी पंधरा हजार रुपयांची मदत केली. तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. या प्रकरणातील 12 मुख्‍य आरोपींना व 20 ते 25 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राईनपाडा या भागात पोलीस अधिकारी मुक्कामी असून अजूनही अनेक संशयित हाती लागण्याची शक्यता आहे. या घटनेची फिर्याद पिंपळनेर पोलीस ठाण्याचे असई रविंद्र काशिनाथ रणधीर यांनी दिली असून तपास साक्रीचे डीवायएसपी श्रीकांत घुमरे हे करीत आहेत. सर्वांवर ३०२,१४३,१४४,१४७,१४८,१४९,३४१,३४२,३५३,३३२,४२७,५०६ प्रमाणे पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कुटुंबियांनी मृतदेह घेण्‍यास दिला होता नकार
हत्याकांडानंतर मृतांचे नातेवाईक मुले, पत्नी, भाऊ, वहिनी यांनी सामोडे-पिंपळनेर रस्त्यालगत एकच आक्रोश केला होता व मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पाचही लोकांचे शव विच्छेदन रविवारी मध्यरात्री पर्यंत पूर्ण करण्यात आले होते. रात्रीच नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्याची तयारी होती. परंतु नाथपंथी गोसावी समाजातील समाजसेवकांनी वेळीच आक्रमक पवित्रा घेतला व आपल्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत मृतदेह न घेण्याचा निर्णय घेतला.


मुख्‍यमंत्र्यांना येथे बोलवा, कुटुंबियांची मागणी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता धुळ्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, एलसीबीचे हेमंत पाटील, प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी पीडित परिवाराची भेट घेऊन मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली. परंतु लेखी आश्वासनाशिवाय शव ताब्यात घेणार नसल्याची आक्रमक भूमिका परिवाराने घेतली. यावेळी सुनील भोसले व गोसावी समाजाचे सरपंच मारुती भोसले यांनी लेखी निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांना येथे बोलवा ही मागणी लावून धरली.

 

विश्रामगृहात तातडीची बैठक

जिल्हाअधिकारी रेखावार यांनी हे प्रकरण हे अत्यंत सांमाज्‍यासाने हाताळत पिंपळनेर विश्रामगृहात ३.३० वाजता बैठक घडवून आणली. या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, एलसीबीचे हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक व्ही. डी. वसावे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, आमदार डी.एस.अहिरे यांसह मृतांचे नातेवाईक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


यापुढे सोशल मीडियावर बारकाईने नजर ठेवून कार्यवाही केली जाईल
या सर्व मागण्या जिल्हाधिकारी रेखावर यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी यांना भ्रमणध्वनीने कळविल्या. योग्य तो निर्णय घेऊन संबंधितांना मदत करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी लेखी स्वरुपात मागण्यांची पूर्तता करण्‍याचे आश्वासन दिले. त्याची एक प्रत संतोष भोसले यांना दिली व शासनाकडून योग्य तो न्याय संबंधितांना दिला जाईल. या गुन्ह्यात जे दोषी असतील त्यांना कठोर शासन कसे होईल यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन दिले. तसेच याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही रेखावार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यापुढे सोशल मीडियावर बारकाईने नजर ठेवून कार्यवाही केली जाईल व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

हे आहेत 12 मुख्‍य आरोपी 

1) बाळु भवरे (रा. राईनपाडा)
2) सुरेश मोतीराम बोरसे 
3) अशेक गोपाल राऊत (रा. राईनपाडा)
4) महारू पवार (रा. जामनपाडा)
5) मोतीलाल काशिनाथ साबळे 
6) दिपक रमेश गांगुर्डे 
7) बाबुलाल महाळशे 
8) संदिप महाळशे 
9) दिलीप गवळी (रा. काकरवाडा)
10) काळू सोन्‍या गावीत 
11) सोमा काळ्या व इतर 20 ते 25 संशयित  


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, काय घडले होते त्‍यादिवशी...व जातानाचे कुटुंबीयांचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...