आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन करून अश्लील बोलतात लोक, तरूणीचा 8 वर्षांपासून सतत सुरू आहे छळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- एमपीएससीची नियमीत परीक्षा देणाऱ्या एका तरुणीचा आठ वर्षांपासून विविध लोकांकडून छळ केला जात आहे. अनेक वेळा पोलिस ठाण्यांच्या पायऱ्या झिजवल्यानंतर अखेर या तरुणीने रविवारी सायंकाळी ६ वाजता पोलिस मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोस्टर लावून तासभर उभे राहून न्याय मागितला. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 


पाचाेरा शहरातील तलाठी कॉलनीत राहणारी रुपाली (नाव बदललेले) असे पीडित मुलीचे नाव आहे. रुपाली २०१०-११पासून सातत्याने एमपीएससी परीक्षा देत असून ती यशस्वी ठरत आहे. या कारणामुळे पाचोरा शहरातीलच काही लोक तिरस्कार करून तिला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत असल्याचा अारोप तिने केला आहे. परीक्षेच्या निमित्ताने ती मुंबई, यवतमाळ आदी शहरांमध्ये जात असताना प्रवासात देखील अनोळखी व्यक्ती तिला छळत असतात. या कारणामुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या रुपालीस अस्थमा, दमा या आजारांची लागण झाली. तिच्या सोबत कुटुंबियांची देखील छळ केला जात आहे.

 

दोन स्केच, ७० पेक्षा जास्त मोबाइल क्रमांक 
रुपाली हिची सातत्याने छेड काढणाऱ्या दोन तरुणांचे स्केच तीने तयार करून घेतले आहेत. तसेच तिच्यासह कुटुंबियांच्या मोबाइलवर येणाऱ्या अनोळखी क्रमांकाची यादी केली आहे. त्रास देणारे सुमारे ७० मोबाइल क्रमांक तिने नोंदवून घेतले आहे. हे स्केच व मोबाइल क्रमांक तिने पोलिसांना दिले आहेत. 

 

पुढील स्लाइडवर वाचा, तरूणीने सांगितले फोन करून अश्लील बोलतात लोक...

बातम्या आणखी आहेत...