आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमळनेर (जळगाव)- अमळनेरच्या एसटी आगार वाहतूक नियंत्रकाला मारहाण केल्याप्रकरणी एसटी कामगार संघटनांनी अचानक बंद पुकारला. त्यामुळे तब्बल एक तास वाहतूक बंद झाल्याने सर्व गाड्या उशीरा धावल्या. याप्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एका एसटी वाहकाने एस टी थांबविली नाही याबाबत चेतन रमेश वाघ व संजय भाऊराव पाटील हे दोन्ही जण विचारणा करायला वाहतूक नियंत्रक शाखेत गेले. त्यावेळी तेथे कार्यरत असलेले ब्रिजलाल पाटील व दोन्ही तरूणांचा वाद झाला आणि त्यातून उदभवलेल्या बाचाबाचीत चेतन रमेश वाघ व संजय भगवान पाटील यांनी ब्रिजलाल पाटील यांना मारहाण केली. यावेळी इतर वाहक चालक देखील भांडण सोडविण्यासाठी गेले मात्र ते दोघे तरुण जुमानत नाही हे पाहून याबाबत पोलिसांना ही बाब कळविण्यात आली. त्यावेळी पोलिस निरीक्षक विकास वाघ हे ताफा घेऊन हजर झाले आणि या दोघा तरुणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी वाहतूक नियंत्रक ब्रिजलाल पाटील यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चेतन रमेश वाघ व संजय भगवान पाटील या दोन्ही तरुणांविरोधात भादंवि कलम 353, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पो कॉ सुभाष साळुंखे हे करीत आहेत
सकाळी 8 वाजता ब्रिजलाल पाटील यांना मारहाण झाल्याची माहिती समजताच सर्व कामगार संघटनांनी अचानक बंद पुकारला. त्यामुळे तासभर एसटी सेवा खंडित झाली मात्र आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सेवा पूर्ववत सुरू झाली. यामुळे सर्व बसेस तब्बल 1 तास उशिराने धावत आहेत.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.