आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून उच्चस्तरीय समितीच्या अहवालाची होळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- गेल्या वर्षी 17 ते 20 ऑक्टोंबर दरम्यान सातवा वेजन आयाेग लागु करावा यासह विविध मागण्यांकरता एसटी कामगारांनी बंद पुकारला होता तेव्हा मागण्यांसंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमुन तिने अहवाल सादर करावा, असे फर्मान कोर्टाने काढले होते मात्र, नुकत्याच सादर करण्यात आलेला उच्चस्तरीय समितीचा अहवाल हा असंवेदनशील असल्याने गुरूवारी दुपारी यावल एसटी आगारातील कामगार संघटनांनी त्याची होळी केली व 9 फेब्रुवारी रोजी मुंबईत आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे.

 


एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागु करावा यासह विविध मागण्याकरीता राज्यभरातील परिवहन मंडळ कामगारांच्या संपात यावल आगारातील 371 कर्मचारी सहभागी झाले होते परिणामी 72 एसटी बसेस आगारात थांबल्या होत्या तर लांब पल्ला, आंतर जिल्हा व ग्रामीण भाग अशा आगारातुन दैनदिन होणाऱ्या एकुण 430 फेऱ्या ठप्प झाल्या होत्या. यामुळे आगाराला दैनदिन मिळणारे साडेसहा लाखांचे असे चार दिवसाचे 26 लाखाते उत्पन्न बुडाले होते. शेवटी उच्च न्यायालयाच्या आदेेशाने संप मागे घेण्यात आला होता व उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समितीव्दारे न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते व आता नुकतेच उच्च न्यायालयात समितीनेे अहवाल सादर केला असुन तो असंवेदनशील असल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेने करीत गुरूवारी दुपारी 1 वाजता यावल आगाराच्या आवारात न्यायालयात सादर केलेल्या अहवालाची होळी केली व उच्चस्तरीय समिती विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी एस.टी. कामगार संघटना व इंटक संघटनाचे सर्व कर्मवारी व प्रकाश रावते, एस. ई. जोशी, वाल्मिक सपकाळे, अशोक कोळी, तन्वीर खान, बबलु तडवी, प्रविण काकडे, कमलाकर सोनवणे, रामभाऊ सोनवणे, व्ही. पी. करांडे, पी. के. कोळी, एस. डी. बाविस्कर, डी. एन. ठाकरे सहभागी झाले होते.

 


आक्रोश मोर्चा
उच्चस्तरीय समितीचा अहवाल हा पुर्णपणे अन्यायकारक आहे व असंवेदनशील आहे तेव्हा सरकारला जाब विचारण्याकरीता व मागण्या मान्य करण्याकरीता येत्या 9 फेब्रुवारीला मुंबई मुख्यालयावर आक्रोश मोर्चा काढला जाईल, अशी माहिती संघटनेचे सचिव प्रकाश रावते व एस. ई. जोेशी यांनी दिली.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...