आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम पटेल समाजात नाहक खर्च टाळण्यासाठी प्रथमच साखरपुडा-लग्न एकाच दिवशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)-  मुस्लिम पटेल, देशमुख व देशपांडे या अल्पसंख्याक समाजात प्रथमच रूढी परंपरेला फाटा देत रविवारी (दि.4) सकाळी साखरपुडा व सायंकाळी लग्न (निकाह) पार पडला. साध्या पध्दतीने नाहक खर्चाला फाटा देण्यासाठी हा निर्णय दोन्ही कुटूंबियांनी घेतला.

 


शहरातील विरार नगरातील रहिवासी नुरमोहमंद मियालाल पटेल यांची कन्या सनाबानो हिचा जळगाव येथील रहिवासी युसूफ मुसा पटेल यांचा मुलगा इम्रान यांच्याशी रविवारी साखरपुडा होता. सकाळी 11 वाजता कार्यक्रम पार पडल्यावर पाहुण्यांनी एकत्र येत लग्नाची तारीख निश्चित करण्याकरीता बैठक घेतली. तेव्हा भाजप अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष रज्जाक पटेल, सोनु हाजीछोटू पटेल, खालीद शेख, युनूस पटेल,रब्बानी पटेल यांच्यासह मान्यवरांनी दोन्ही कुटूंबांना सर्व नातलग या साखरपुड्यात एकत्र आले आहेत तेव्हा सायंकाळी रूढी परंपरेंना फाटा देत विवाह करावा अशी विनंती केली. त्यास दोन्ही पक्षांनी मान्यता दिली. त्यानंतर हा विवाहसोहळा पार पडला.

 


मुस्लिम पटेल, देशमुख, देेशपांडे समाज हा प्रामुख्याने धुळे, जळगाव व बुलढाणा जिल्ह्यात आहेे तर गुजरात राज्यातील बारडोली येथे अधिक प्रमाणात वास्तव्यास आहे. या समाजात प्रथमच अशा प्रकारचा विवाहसोहळा पार पडला आहे.

 

 

नाहक खर्च टाळण्याची गरज
पटेल समाजात विवाह सोहळ्यापुर्वी मुलांकडील मंडळी मान (कंदोरी) द्यायचे. त्यात जेवण द्यावे लागते. त्यानंतर हळद व हळदीचे जेवण, त्यानंतर लग्नापुर्वी मुलाकडे जेवणनंतर जवळच्या नातलगांचे मानपान व नंतर वरात या सर्व खर्चिक बाबींना या विवाहसोहळ्यात फाटा देण्यात आला. याचा सर्वांनीच आदर्श घ्यावा, असे अावाहन करण्यात आले आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...