आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरियत में मदाखलत बर्दाश्त नही, जळगावमध्‍ये हजारो मुस्लिम महिला उतरल्या रस्त्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - 'शरियत में मदाखलत बर्दाश्त नही करेंगें' (शरियतमध्ये हस्तक्षेप, ढवळाढवळ सहन केली जाणार नाही), 'हम कानून -ए - शरियत के पाबंद है','मेरी शरियत,मेरी पहचान,यही सबका एकान' अशा घोषणांचे फलक हाती घेऊन हजारो मुस्लिम महिला गुरुवारी तीन तलाक कायद्याविरोधात आपला निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.

 

मराठा मोर्चा, अलीकडेच मुंबईत झालेल्या आदिवासी शेतकरी मोर्चाच्या धर्तीवर शिस्तबध्द नियोजन करुन हा मोर्चा काढला. पारंपरिक वेशभूषेत हजारो मुस्लिम महिलांचा मोर्चा खान्देश सेंट्रलपासून सुरु झाला आणि त्याचा जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप झाला.

 

माेर्चाची नियाेजित वेळ दुपारी ३ वाजेची होती. प्रत्यक्षात तो तासभर उशिरा सुरु झाला. तत्पूर्वी, महिला वक्त्यांनी माेर्चात सहभागी महिलांना ऑल इंडिया पर्सनल लाॅ बोर्डाच्या महिला प्रतिनिधींने तीन तलाक कायद्याविषयी माहिती दिली. माेर्चाच्या अग्रभागी मुस्लिम तरुणींनी माेठे बॅनर हातात घेतले हाेेते. त्यामागे सर्व माेर्चेकरी महिला चालत हाेत्या. खुल्या जीपमध्ये मागण्याचा घाेषणांचा फलक लावण्यात अाला हाेता. त्यात बसलेल्या काही महिला घाेषणा देत हाेत्या.


कायद्यात तलाकचा उल्लेख नाही
तीन तलाक कायद्यामुळे मुस्लिम महिलांना लोकशाही नुसार हक्क मिळणार नाहीच उलट हिरावला जाणार आहे. हा पुरुषांविरोधात महिलांना उभे करण्याचा प्रयत्न आहे. तीन तलाक कायदा हा मुस्लिम समुदायाविरोधात रचण्यात आलेले मोठे कारस्थान आहे. या कायद्यामुळे अाम्ही अामच्या पुरुषांना तुरुंगात जाऊ देणार नाही. हा मुस्लिम महिलांना एकटे पाडण्याचा प्रयत्न सरकार करीत अाहे, असा आरोप ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रतिनिधी सुमय्या नसीम नौमानी यांनी केला. मोर्चा सुरु होण्यापूर्वी खान्देश सेंट्रल येथे तसेच समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना नौमानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मोदी सरकारवर जोरदार टीका केली.


मुस्लिम पर्सनल लाॅ बाेर्डापासून हा कायदा वेगळा केला जात अाहे. 'मुस्लिम खवातिन कायदा २०१७ 'असे त्या कायद्याचे नाव असून काेठेही तीन तलाक शब्दाचा उल्लेख केलेला नाही. या कायद्यात खूप चुका अाहेत. केंद्र सरकारला कायदा करण्याची खूप घाई झाली अाहे. मुस्लिम समाजातील महिलांविषयी कायदे करायचे तर मग त्या समाजातील महिलांना विश्वासात घेणेही गरजेचे हाेते. अाम्हाला काेणी विश्वासातही घेतले नाही. केंद्र सरकार चर्चा करण्यासही तयार नाही. या कायद्यामुळे अाम्ही अामच्या पुरुषांना तुरुंगात जाऊ देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.


प्रथमच प‌ंथ, बिरादरी, समुदाय एकत्र
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते मुलांच्या निरीक्षणगृहापर्यंत संपूर्ण रस्ता महिलांनी व्यापला हाेता. या वेळी वजीद फाउंडेशनने महिलांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली हाेती. माेर्चाच्या यशस्वितेसाठी मुस्लिम समाजातील सर्व पंथ, बिरादरी, अल्पसंख्यांक समुदायाचे सर्व राजकीय पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी प्रथमच एकत्रित येऊन मूकमाेर्चाचे सर्व नियाेजन पूर्ण करून माेर्चा यशस्वीपणे पार पाडला.

 

'दरुद शरीफ'च्या पठणाने सुरुवात तर दुअाने समाराेप
मूकमाेर्चात सहभागी महिलांनी सुरुवातीला दरुद शरीफचे पठण केले. दरुद शरीफ म्हणजे अल्लाहचे नाव घेणे. अन्याय हाेत असल्यास ताे अन्याय अल्लाह दूर करेल, असे या दरुद शरीफचा अर्थ अाहे. तर माेर्चाचा समाराेप हा दुअा मागून म्हणजेच प्रार्थनेने करण्यात अाला. यामध्ये तलाक कायद्याविरोधात महिला एकवटल्या अाहेत, तो कायदा रद्द होवो, त्यांना यश मिळाे, अशी प्रार्थनाही करण्यात अाली.

 

अर्धा तास थांबवली वाहतूक
मूकमाेर्चा दरम्यान गाेविंदा रिक्षा स्टाॅप, शिवाजी पुतळा, स्टेडियम चाैक परिसर, स्वातंत्र्य चाैकात काही काळ वाहतूक थांबवण्यात अाल्याने खाेळंबा झाला. काेर्ट चाैकात अर्धा तास नागरिक थांबून हाेते. जिल्हा पाेलिस अधीक्षक कार्यालयामार्गे अनेक बसेस वळवण्यात अाल्या हाेत्या. तर काही बसेस या वाहतूक शाखेत पार्किंग करण्यात अाल्या. माेर्चामुळे बाहेर गावाहून अालेल्या अनेक प्रवाशांना रिक्षा न मिळाल्याने पायी जावे लागले.

बातम्या आणखी आहेत...