आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचे विधेयक मंजूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर/ जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याबाबतच्या विधेयकाला सोमवारी विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठामध्ये बोली भाषा वर्ग सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी दिले. 


उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. तावडे म्हणाले, बहिणाबाईंना त्यांच्या कवितेमधून जो माणूस अपेक्षित होता, तो या विद्यापीठाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ११ ऑगस्टला बहिणाबाईंच्या जयंतीदिनी विद्यापीठाचा नामविस्तार कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला जाईल. या विद्यापीठात बहिणाबाई चौधरींच्या नावे अध्यासन सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असेही तावडे यांनी या वेळी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...