आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक-साक्री एसटी बस व केमिकल टॅंकरचा भीषण अपघात, 14 प्रवासी जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर (धुळे) - साक्री तालुक्यातील देशशिरवाडेजवळ नाशिकहुन साक्रीकडे जाणारी एसटी बस व टॅंकरची समोरासमोर धडक झाल्याने 14 प्रवासी जखमी झाले आहेत. यात 6 प्रवाशी गंभीर जखमी आहेत. जखमींना ग्रामीण रुग्णालय, पिंपळनेर येथे तर गंभीर जखमींना धुळ्याच्‍या शासकीय रुग्णालयात पाठविण्‍यात आले आहे. आज दुपारी 2.30 वाजता हा अपघात घडला.


नाशिकहून साक्रीकडे येणारी एसटी (MH 40 BL 9912) देशशिरवाडे गावाजवळ आली असताना पिंपळनेरकडून नाशिककडे जाणा-या केमिकल टॅंकरने ( GJ 06 YY 8940) बसला समोरून धडक दिली. टॅंकर मध्ये रसायन असल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात सुदैवाने टँकर पलटी न झाल्‍याने रसायनाचा कोणताही धोका निर्माण झाला नाही व मोठी जिवीत हानी टळली. सदर घटनेची माहिती मिळताच सपोनि पंजाबराव राठोड व त्यांच्‍या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. संबंधितांवर अपघाताचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

जखमी प्रवासी
- महेंद्र कृष्णाजी खैरनार (वय४७) रा.सटाणा,
- चंद्रकांत शिवाजी नंदन (वय २४) रा.तहाराबाद,
- गणेश शिवाजी बच्छाव (वय ३७ वाहक) रा.धमनार,
- निलेश शंकर पवार (वय०६) रा.दहिंदुळे सटाणा,
- दत्तु साहेबराव पवार (२४) रा.दहिंदुळे, निलम
- दत्तु पवार (२८) रा.दहिंदुळे,
- गोकुळबाई प्रल्हाद भामरे (६०) सोमपुर
- नरेंद्र अन्न राठोड (२६)रा.अक्कलपाडा

 

गंभीर जखमी
- पांडुरंग तानाजी माळी (६०) रा. धुळे,
- बाईजाबाई नारायण पिंपळे(६५)रा.शिधोन,
- जयेश राजेंद्र ततार (१७)रा.पिंपळनेर,
- सिंधुबाई वामन सोनवणे (५५)रा.पिंपळनेर,
- पोपट सोनु सगर(४५चालक) रा.महिर, दावित
- तात्या मावची (३२)रा. नवापाडा ता.साक्री

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, अपघाताची भीषणता दर्शविणारे फोटोज...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...