आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणुकीअाधीच लावणार गाळ्यांचा निकाल; नवनियुक्त अायुक्त चंद्रकांत डांगे यांनी घेतला पदभार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील विकासाची कामे अार्थिक बाबींवर अवलंबून असतात. पैशांचे साेंग करतात येत नाहीत, त्यामुळे अाधी अार्थिक स्थिती मजबूत करणे हेच मुख्य उद्दिष्ट असेल. महापालिका निवडणुकीपूर्वी गाळे प्रकरण निकाली काढणार असल्याची माहिती साेमवारी नवनियुक्त अायुक्त चंद्रकांत डांगे यांनी पत्रकारांशी बाेलताना दिली. दरम्यान, काेणाच्या दबावाखाली काम करू   नका, अशी सूचना भाजप नगरसेवकांनी करताच 'जखमा माेठ्या असल्यामुळेच शासनाने जळगावात सर्जन पाठवला,' असे वक्तव्य करत अागामी काळात प्रशासनाची मर्जी चालेल असेच सूताेवाच अायुक्त डांगेंनी केले. 


महापालिकेच्या अायुक्तपदी राज्य शासनाने नियुक्ती केलेले अायएएस अधिकारी चंद्रकांत डांगे साेमवारी सकाळी १०.३५ वाजता सतरा मजली इमारतीत दाखल झाले. या वेळी उपायुक्त चंद्रकांत खाेसे, लक्ष्मीकांत कहार, शहर अभियंता डी. बी. दाभाडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर १३ व्या मजल्यावरील अायुक्त कार्यालयात प्रवेश करत अायुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. दरम्यान, सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी तथा प्रभारी अायुक्त किशाेर राजेनिंबाळकर यांनी पालिकेत येऊन १५ मिनिटे कामकाज पाहिले. परंतु नवनियुक्त अायुक्त डांगे यांच्या अागमनापूर्वीच राजेनिंबाळकर निघून गेले हाेते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास अायुक्त डांगेंनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक बाेलावत अाेळख करून घेतली. तसेच कामकाजाचे स्वरूप जाणून घेतले. त्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांनंतर अायुक्त कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. 


दबावात काम करू नका 
अायुक्त डांगे यांनी पदभार घेतल्यानंतर भाजप शिष्टमंडळाने त्यांचे स्वागत केले. विराेधी पक्षनेते वामनराव खडके, गटनेते सुनील माळी, पृथ्वीराज साेनवणे, रवींद्र पाटील, ज्याेती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, जयश्री पाटील, अनिल देशमुख, नितीन पाटील, किशाेर बाविस्कर यांनी निवेदन दिले. या वेळी चर्चेदरम्यान भाजप नगरसेवकांनी अायुक्तांना 'काेणाच्याही दबावाखाली काम करू नका,' असा सल्ला देखील दिला. त्यावर जखमा माेठ्या असल्यामुळेच शासनाने सर्जन पाठवल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच शासनाची स्पष्ट भूमिका असल्यामुळे अायएएस अधिकारी नियुक्त केल्याचे डांगेंनी सांगितले. महापालिकेने व्याजाने पैसे घ्यायचे अाणि फुकटात वाटायचे, अशी या पालिकेत कामाची पद्धत असल्याचे सांगत गटनेते माळी यांनी अप्रत्यक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 


मतदार यादीतील घाेळ टाळा 
महापालिका निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घाेळ हाेईल असे भाकीत भाजप नगरसेवकांनी व्यक्त केले. २००२ च्या विधानसभा निवडणुकीचा दाखल देत मतदार यादीतील असंख्य नावे शहरातील अन्य भागात टाकण्यात अाली हाेती. त्यामुळे मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले हाेते. त्याचा परिणाम म्हणजे निकालदेखील वेगळा लागल्याचे भाजप नगरसेवकांचे म्हणणे अाहे. तेव्हापासूनच मतदार यादीतील नावांचा घाेळ सुरू अाहे. ज्या प्रभागाची यादी असेल त्याच प्रभागातील मतदारांची नावे त्यात असावीत. त्यात काही चुका अथवा घाेळ अाढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दाेषी धरून थेट बडतर्फ करावे, अशी मागणी केली. पालिकेचे अभियंते हे सत्ताधाऱ्यांच्या हाताखालचे बाहुले असल्याचा अाराेप करत यंदादेखील मतदार यादीत घाेळ हाेण्याची शक्यता वर्तवली अाहे. अायुक्त डांगे यांनी मतदार यादी अचूक तयार करण्याचे अाश्वासन दिले. मतदार यादीतील चुकांबाबतचे निवेदन राज्य निवडणूक अायाेगालादेखील पाठवले अाहे. 


गाळे प्रकरणावर विशेष भर 
राज्यातील 'ड' वर्ग महापालिकांमध्ये अग्रक्रमांवर नाव घेतले जाणाऱ्या जळगाव महापालिकेची अार्थिक स्थिती बिकट असल्याचे अायुक्त चंद्रकांत डांगे जाणून अाहेत. पालिकेचे शासन पातळीवरील प्रलंबित प्रश्न तसेच पालिका पातळीवर केवळ अंबलबजावणीअभावी अडकून पडलेल्या विषयांची माहिती उपायुक्तांकडून जाणून घेतली. पालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या गाळ्यांचा प्रश्न मार्गी लागला तरी शहरातील विकासकामांची माेठी अडचण दूर हाेईल, असा विश्वास डांगेंनी व्यक्त केला. विकासासाठी पैशांची गरज भासणार अाहे. त्यामुळे अार्थिक स्थिती मजबूत कशी हाेईल; यादृष्टीने उपायाेजना करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. गाळे प्रकरणात न्यायालयाचेही अादेश अाहेत. शासनानेदेखील कारवाई करण्याचे अादेश दिले अाहेत. त्यामुळे अाता गाळे प्रकरण निकाली काढण्यावर विशेष भर असेल, असे अायुक्तांनी स्पष्ट केले. 


नगरसेवकांकडून वसुली करा 
गतनिवडणुकीत घरकुल व फुकट बससेवाप्रकरणी अाजी- माजी नगरसेवकांना दीड काेटी रुपयांची वसुली नाेटीस बजावली हाेती. त्यात न्यायालयात स्थगिती घेतल्यानंतर पुढे काय झाले काहीही कळू शकलेले नाही. नगरसेवकांकडून पैसे वसूल केल्यास पालिकेची अार्थिक स्थिती मजबूत हाेईल, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी चर्चेदरम्यान अायुक्त डांगे यांच्याकडे केली. त्याचप्रमाणे पालिकेच्या ३९३ खुल्या जागांचा व्यावसायिक वापर सुरू अाहे. शाळा, मंगल कार्यालय उभारली असून लाखाे रुपये कमावले जात अाहेत; पण त्याचा पालिकेच्या तिजाेरीत एक रुपयांही पडत नाही, अशी खंत व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...