आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसने दुचाकीस्वाराला २० फूट नेले फरफटत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महामार्गावर सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता दुचाकीस्वार तरुण बांभोरीकडे जात असताना अचानक वळण घेतलेल्या खाजगी बसच्या पुढील बाजूला दुचाकीचे हॅन्डल अडकले. त्यामुळे दुचाकीसह तरुण २० फूट फरफटत गेला. यात तरूण किरकोळ जखमी झाला असून दुचाकीचे नुकसान झाले आहे. 

 

वाल्मिकनगरातील विलास सोनवणे (वय ३५) हे सोमवारी सायंकाळी दुचाकीने (क्रमांक एमएच १९ सीएन ७०७०) बांभोरी येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते. खोटेनगर स्टॉपच्या पुढे बाजूने आलेल्या जैन इरिगेशन कंपनीच्या खाजगी बसचे (क्रमांक एमएच १९ ५८६९) चालक यशवंत बिऱ्हाडे (रा.बांभोरी) यांनी वळण घेतले. त्यामुळे बसच्या पुढील बाजूमध्ये दुचाकीचे हॅन्डल अडकून विलास सोनवणे हे २० फरफटत गेले. अपघातानंतर दोन्ही वाहने तालुका पोलिसांत आणण्यात आली. सोनवणे यांच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.