आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाळीसगाव : चालकाच्या डुलकीने बस झाडावर अादळली; १७ प्रवासी बचावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - चालकाला डुलकी लागल्याने अाैरंगाबाद-शिंदखेडा ही बस रस्त्याच्या काठावरील झाडावर अादळली. दरवाजातून चढून प्रवाशांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. मात्र, मदतीसाठी धावून अालेले पादचारी, वाहनचालक व शेतकऱ्यांनी अापत्कालीन खिडकी उघडून १७ जखमी प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अाले. चाळीसगाव तालुक्यातील रांजणगावजवळ रविवारी सकाळी ६ वाजता ही घटना घडली. 


चालक धोंडू तुकाराम वाघ व वाहक बी. के. पाटील हे शिंदखेडा आगाराची औरंगाबाद-शिंदखेडा ही बस (एमएच ४० एन ९९०७) घेऊन औरंगाबादहून रविवारी (दि.२९) पहाटे चार वाजता निघाले. बसमध्ये एकूण १७ प्रवासी होते. चालकाला अचानक डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून ही बस सकाळी ६ वाजता चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव फाट्याजवळ झाडावर अादळली. अपघातात बसचालक, वाहक व १७ प्रवाशांना जबर मार लागला. अपघात झाल्यानंतर रस्त्याने जाणारे अन्य वाहनातील प्रवासी, परिसरातील हॉटेल कामगार व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 


बसच्या दरवाजातून प्रवाशांना बाहेर काढणे अशक्य होते. त्यानंतर अापत्कालीन खिडकी उघडून त्यातून जखमी प्रवाशांना बाहेर काढले.  भ्रमणध्वनीवरून १०८ क्रमांकाशी संपर्क साधून रुग्णवाहिका मागवण्यात अाली. डॉ. नितीन सांळुखे यांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणले. 

बातम्या आणखी आहेत...