आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंविरोधात बनावट धनादेश बनवून कट, दमानियांवर गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर - साडेनऊ कोटी व १० लाख रुपयांचे बनावट धनादेश तयार करून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा कट रचल्याप्रकरणी   सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह ६ जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांत  गुन्हा दाखल करण्यात आला.  जळगावच्या अॅक्सिस बँकेच्या नावाचा साडेनऊ कोटी व चोपडा अर्बन बँकेच्या नावे १० लाखांचा बनावट धनादेश तयार केल्याचा  दमानिया व अन्य सहा जणांवर आरोप आहे.  याप्रकरणी खडसेंनी मुक्ताईनगर न्यायालयात तक्रार केली होती. तेथे झालेल्या सुनावणीनंतर २४ तासांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मंगळवारी न्यायालयाने   दिले होते. 

   
खडसेंच्या नावे असलेल्या धनादेशांच्या छायांकित प्रती दमानिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरल्या किंवा त्या बनावट तयार केल्या. हे धनादेश दमानिया यांनी उच्च न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले होते.  मात्र,  ते बनावट असल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले. याआधारे खडसेंनी दमानिया व इतरांविरुद्ध बनावट दस्तऐवज तयार करणे, फसवणुकीचा कट रचणे आदी आरोप ठेवून फिर्याद दाखल केली.  त्यावर मंगळवारी युक्तिवाद झाला. त्यात खडसे यांच्या फिर्यादीत तथ्य आढळल्याने न्यायालयाने अंजली दमानिया, रोशनी राऊत, गजानन मालपुरे, सुशांत कुऱ्हाडे, सदाशिव सुब्रमण्यम, चारमॅन फर्नस यांच्याविरुद्ध २४ तासांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानुसार बुधवारी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

 

पुढील स्लाईडवर वाचा, मला अडकवण्यामागे ‘मंत्र्यांचा’ हात : खडसे..... 

बातम्या आणखी आहेत...