आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- जिल्ह्यातील अाराेग्य यंत्रणेची वाट लागली अाहे. मुक्ताईनगर, बाेदवड अाणि वरणगाव येथील शासकीय रूग्णालयांना बंदचे बाेर्ड लावण्याची वेळ अाली अाहे. अाराेग्य संचालकापासून तर अाराेग्य मंत्र्यापर्यंत प्रत्यक्ष पाठपुरावा करूनही डाॅक्टरांची रिक्त पदे भरली जात नाहीत. त्यामुळे अखेर या मागण्यांसाठी अापण जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण करणार असल्याचा इशारा भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी दिला अाहे. माझे उपाेषण हे सरकारविराेधी पाऊल नसून नागरिकांच्या समस्याच सुटत नसल्याने नाईलाजाने घेतलेली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जळगाव जिल्ह्यात ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक अाराेग्य केंद्रात डाॅक्टरांची पदे रिक्त अाहेत. खेड्यावरून येणाऱ्या अत्यवस्थ रूग्ण, गराेदर महिला रूग्णालयात अाल्यानंतर त्यांना डाॅक्टर नसल्याचे सांगितले जाते. येथून पुन्हा खासगीमध्ये जावे लागते. रूग्णांची ही गैरसाेय अाणि हेळसांड टाळण्यासाठी किमान दवाखान्यापुढे बंदचे फलक लावावे. डाॅक्टरांच्या भरतीबाबत गेल्या अडीच वर्षात अाराेग्य मंत्र्यासाेबत चार वेळा बैठक घेतली. अाराेग्य संचालकांला ३० वेळा भेटलाे, उपसंचालकांला ५० पेक्षा अधिक वेळा संपर्क केला, जिल्हा नियाेजन समितीपासून तर विधानसभेपर्यंत पाठपुरावा केला, परंतु अाराेग्य यंत्रणा हलायला तयार नाही. त्यामुळे अखेर उपाेषण केल्याशिवाय पर्याय नसल्याचे अामदार खडसे म्हणाले.
१०० काेटींचा निधी परत
जळगाव शहरातील समांतर रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मालकीचे नाहीत. महापालिकेकडे ते असल्याने त्यावर अाम्ही खर्च करू शकत नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अापल्याला सांगितले. त्यामुळे अाता मंजुर झालेला १०० काेटीचा निधी देखील परत गेल्याचे खडसे म्हणाले. महामार्ग चाैपदरीकरणाच्या तरसाेद ते चिखली या टप्प्याला देखील ठेकेदार प्रतिसाद देत नाहीत. अातापर्यंत दाेन ठेकेदारांनी नकार दिला असून सध्या एक ठेकेदार तयार झाला अाहे, असे खडसे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.