आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी याेजना : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ८० हजारांवर शेतकऱ्यांना अनुदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा बॅंकेकडून घेतलेल्या पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या ८० हजारांवर शेतकरी 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २५ हजार रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहनपर अनुदानास पात्र ठरलेले आहेत. शासनाकडून त्यांना हे अनुदान वितरित करण्यात येत आहे. 


शासनाने जून २०१६पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत थकीत असलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, हा निर्णय घेताना नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, याबाबत शासनाने काळजी घेतलेली आहे. अशा शेतकऱ्यांसाठी २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दीड लाख रुपयांवरील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट जाहीर केलेली आहे. या शेतकऱ्यांनी उर्वरित थकबाकी भरल्यानंतर दीड लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येत आहे. दरम्यान, जुलै महिना उजाडून ही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. तर खरिप हंगामात पेरणीसाठी नवीन पीक कर्ज देखील मिळत नसल्याने जिल्हाभरातील शेतकरी चांगलेच त्रस्त झाले अाहेत. 


१३४ कोटींवर मिळणार अनुदान 
जिल्ह्यातील ८० हजार ९४९ शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची मुदतीत परतफेड केलेली आहे. त्यांनी कर्जमाफी योजनेंतर्गत अर्ज भरलेला होता. हे सर्व शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यास पात्र ठरलेेले आहेत. त्यांना १३४ कोटी ५७ लाख १३ हजार ८६७ रुपयांचे अनुदान मिळणार आहे. दीड लाखावर कर्ज असलेले ९ हजार ७२ शेतकरी होते. त्यांना ओटीएसअंतर्गत दीड लाख रुपयांवरील कर्ज भरल्यानंतर १०८ कोटी ३६ लाख १० हजार २७२ रुपयांची कर्जमाफी देण्यात येत आहे. 


आतापर्यंत पावणेदोन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी 
जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासद असलेल्या १ लाख ८७ हजार ३४८ शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानांतर्गत ७३१ कोटी ४६ लाख रुपये जमा करण्यात येत आहेत. ही परिस्थिती असतानाही जिल्ह्यातून कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त होत आहेत. आतापर्यंत कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या नऊ ग्रीन लिस्ट आलेल्या आहेत. नवव्या ग्रीन लिस्टमध्ये ४ हजार शेतकऱ्यांचा डाटा जुळत नसल्याचे आढळून आलेले आहे. ही यादी तालुकास्तरावर दुरुस्तीसाठी पाठवण्यात आलेली आहे. त्यामधील चुका दुरुस्त करून पुन्हा अद्ययावत यादी शासनाला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कर्जमाफीच्या आकड्यात वाढ होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...