आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निवडणुकीत गैरप्रकार राेखण्यासाठी फिरते अन‌् बैठे पथक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका निवडणुकीत उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करणे बंधनकारक अाहे. अायाेगाने निश्चित केलेल्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल. अन्यथा संबंधित उमेदवारांना नाेटीस व अपात्रतेच्या कारवाईला सामाेरे जावे लागेल. निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलाेभन देण्याचे प्रकार घडतात. उमेदवारांकडून हाेणारे गैरप्रकार राेखण्यासाठी शहरात विविध ठिकाणी फिरते व बैठे पथक तैनात करण्यात अाल्याची माहिती निवडणूक अायाेगाचे अायुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकारांना दिली.


महापालिकेच्या चाैथ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या कामकाजाचा अाढावा घेण्यासाठी अायुक्त सहारिया बुधवारी जळगावात अाले हाेते. पत्रकारांशी बाेलताना निवडणुकीसाठी राबवण्यात अालेल्या यंत्रणेची माहिती त्यांनी दिली. निवडणूक खर्चासाठी १४ लेखा संवर्गाचे अधिकारी मदतीसाठी घेण्यात अाले अाहेत. अाचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी ५ चेकपाेस्ट पथक, ३ भरारी पथक, १९ व्हिडिअाे सर्व्हिलियन्स टीम, ३ व्हिडिअाे विविंग टीम, १ रेल्वे भरारीपथक, ४ अायकर अधिकारी पथक नियुक्त करण्यात अाले अाहेत, अशी माहिती या वेळी माध्यमांना देण्यात अाली.

 

पाेलिसांची ५० वाहनांतून गस्त
शहरातील ४८ अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर व्हिडिअाे कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार अाहेत. पाेलिस प्रशासनाकडील वाहनांव्यतिरिक्त महापालिकेने सुमारे ५० अतिरिक्त वाहने पाेलिसांना दिली अाहेत. शहरातून अाचारसंहिता भंगची तक्रार केल्यास पाेलिसांचे पथक अवघ्या तीन ते चार मिनिटांत घटनास्थळी पाेहाेचेल, अशी तयारी असल्याची माहिती पाेलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयितांवर पाेलिसांच्या पथकाची सूक्ष्म नजर अाहे. कुठेही संशयास्पद हालचाली अाढळल्या तर त्यांची पडताळणी करून थेट कारवाई करण्यात येईल, असे पाेलिस अधीक्षक कराळे यांनी या वेळी अावर्जून नमूद केले.

 

मतमाेजणी करण्यासाठी २२० कर्मचारी
निवडणुकीसाठी एकण ५५० कंट्राेल युनिट व २१०० बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात अाले अाहेत. ३ अाॅगस्ट राेजी एमअायडीसीतील ई ८ याठिकाणी मतमाेजणी हाेईल. यासाठी २२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे. अादर्श मतदान केंद्र तपासणीसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालय येथील प्राध्यापक, जळगाव व्यापारी संघ व राेटरी क्लब प्रतिनिधींचा समावेश असलेली १० पथके तयार केली अाहेत, अशी माहिती देण्यात अाली.

 

फाेटाे काढून करा तक्रार
अाचारसंहिता भंगसंदर्भात नागरिकांना घरबसल्या तक्रार करता येणार अाहे. यासाठी अायाेगाने अॅप तयार केले अाहे. पैसे अथवा वस्तू वाटपासंदर्भात थेट फाेटाे काढून तक्रार करता येईल. तक्रारदाराचे नाव व माहिती गुप्त ठेवली जाणार अाहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी न घाबरता फाेटाे अपलाेड करावे, असे अावाहन अायुक्त सहारिया यांनी येथे केले.

 

अफवांना अाळा घालणार
साेशल मीडिया जेवढा उपयाेगी ठरताे, तेवढाच गैरवापरही हाेत अाहे. त्याचे अनेक प्रकार उघडकीस येत अाहेत. साेशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर राहणार अाहे. वातावरण दूषित करण्याचा प्रकार उघड झाल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई हाेईल, असे सांगण्यात अाले.

 

बातम्या आणखी आहेत...