आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणुकीमुळे गाळे लिलाव लांबणीवर टाकण्याच्या हालचाली, 40 गाळेधारकांनी बदलले चेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गाळे लिलावासंदर्भात पालिका प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईला ब्रेक लावण्याच्यादृष्टीने अाता मंत्रालय स्तरावर जाेरदार प्रयत्न सुरू झाले अाहे. काेणत्याही परिस्थितीत महापालिका निवडणुकीपर्यंत लिलावाची प्रक्रिया लांबवण्याच्या जाेरदार हालचाली सुरू झाल्या अाहेत. नागरिकांना सेवा सुविधांसोबत महापालिका कर्मचाऱ्यांचीही थकबाकी अदा हाेत नसल्याने महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले अाहे.

 

महापालिकेच्या विकासाच्या दृष्टीने तसेच गाळेप्रकरणात गेल्या चार महिन्यात कमालीची गती अाली हाेती. न्यायालयीन खटल्यांमध्येही पालिकेची प्रत्येक भूमिका याेग्य ठरवली जात असल्याने अधिकाऱ्यांचा उत्साहदेखील वाढला हाेता. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत लोकप्रतिनिधी व गाळेधारकांनी अापली कैफियत मांडल्यानंतर अपर अायुक्त राजेश कानडेंकडील पदभार तडकाफडकी काढून घेण्यात अाला अाहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत अाहे. गाळे प्रकरणात लवकर कारवाई हाेऊन नागरिकांना मुलभुत सुविधा व कर्मचाऱ्यांचे घेणे अदा केले जाईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना हाेती; परंतु एेन महत्वाच्या वेळी शासनाकडून ब्रेक लावला जात असल्याचे बाेलले जात अाहे. दरम्यान, गाळे लिलावाची कारवाई अाणखी सहा महिने लांबवण्याच्या हालचालींना वेग सध्या वेग अाल्याचे अाल्याचे खात्रीलायक वृत्त अाहे. तशा घटना देखील दरराेज घडत अाहे.


धनादेशात राहिल्या तांत्रिक चुका
मनपाच्या व्यापारी संकुलातील बहुसंख्य गाळेधारकांनी बिलापाेटी काही रक्कम धनादेशाद्वारे पालिकेत जमा केली हाेती. पालिकेने बँकेत धनादेश वटवण्यासाठी टाकले असता माेठ्या प्रमाणात धनादेश अनादर हाेत असल्याचे पुढे अाले हाेते. यात धनादेशात तांत्रिक चुका राहिल्याचे पुढे अाले. या धनादेश अनादरप्रकरणी पालिकेने कारवाईचा इशारा दिल्यानंतर शुक्रवारी ४० गाळेधारकांनी धनादेश बदलवून दिले तर काही गाळेधारकांनी धनादेश न देता राेख रक्कम जमा केली.

 

गाळेधारकांची माहिती मागवली
गेल्या पंधरा दिवसांत किती गाळेधारकांनी पालिकेला पैसे भरून सहकार्य दाखवले अाहे, तसेच किती गाळेधारकांनी पैसे भरले नाहीत? याबाबतची यादी तयार करण्यात येत अाहे. ज्या गाळेधारकांनी एक रूपयाही पालिकेला भरला नसेल, अशा गाळेधारकांबाबत पालिका प्रशासन कारवाईची दिशा ठरवण्याची शक्यता अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...