आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महापालिका: जागांच्या मुद्यावरून नगरसेवकाने पेपर फेकला; भाजपचा सभात्याग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आरक्षित जागांच्या मुद्यावर महासभेत मंगळवारी भाजप नगरसेवक अाणि महापौर यांच्यात जोरदार चकमक उडाली. भाजप नगरसेवक अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त करुन संतापाच्या भरात पेपर टेबलावर फेकला. नगरसेवकाच्या या कृत्यावद्दल तीव्र नाराजी व्यक्त करुन महापाैर ललित कोल्हे यांनी भाजप नगरसेवक विरोधात कारवाई करण्याची घाेषणा केली. तर सत्ताधारी खान्देश विकास आघाडीकडून अावाज दाबण्याचा प्रयत्न हाेत असल्याचा आरोप करुन करुन भाजप नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यामुळे सभागृहात विराेधकच नसल्याने सत्ताधाऱ्यांनी एकूण २५ पैकी २४ विषयांना झटपट मंजुरी देत सभा अाटाेपती घेतली.

 

महासभेत भाजप नगरसेवक रवींद्र पाटील यांनी इतिवृत्तातील विषयांना हात घालण्याचा प्रयत्न केला. अारक्षित जागांचा मुद्दा मांडण्याचा अाग्रह धरला असता अाधी विषय अाटाेपून घ्या नंतर बाेलण्याची संधी दिली जाईल, असे महापाैर ललित काेल्हे यांनी सांगितले. परंतु इतिवृत्ताला मंजुरी देण्यापूर्वी बाेलू द्यावे,अशी मागणी नगरसेवकाने केली. तेव्हा महापाैर देखील ठाम राहिल्याने सत्ताधारी व भाजप यांच्यातील संघर्ष तीव्र झाला.


वामनराव खडकेंनी घेतली व्यासपीठाकडे धाव
भाजप नगरसेवकांना बाेलू दिले जात नसल्याचे लक्षात येताच विराेधी पक्षनेते वामनराव खडके यांनी थेट महापाैरांच्या व्यासपीठाकडे धाव घेतली. 'नगरसेवकांचा अावाज दाबण्याचा प्रकार करू नका त्यांना बाेलू द्या,' असे खडके म्हणाले. या वेळी भाजपचे अन्य नगरसेवकही वेलमध्ये गाेळा झाले. भाजप नगरसेवक बाेलण्याचा अाग्रह धरत असताना मात्र दुसरीकडे नगरसचिवांना विषय वाचण्याची सूचना महापौर करीत होते. नेमके काय घडते अाहे हे समजत नव्हते.

 

देशमुखांविरुद्ध ठराव, सभात्याग
विराेधकांना बाेलू दिले जात नसल्याने नगरसेवक अनिल देशमुख यांनी संतापाच्या भरात अापल्या हातातील कागद समोरच्या टेबलवर फेकून दिले व ते सभागृहातून निघून गेले. देशमुखांचे वर्तन पाहून ही कामाची पद्धत नाही अशा शब्दात महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लगोलग त्यांनी देशमुखांवर कारवाई करण्याची घाेषणा केली. भाजप वगळता खाविअा, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीसह इतर पक्षांनी कारवाईचा ठराव पारीत केला. नगरसेवक रवींद्र पाटील यांनी पुन्हा अाग्रह धरला. या वेळी तुम्ही विनाकारण बाेलत राहतात. एक तास माइक साेडत नाहीत, असे महापौर कोल्हे म्हणताच महापाैरांच्या भूमिकेचा निषेध करुन सर्वच भाजप नगरसेवकांनी सभात्याग केला.


विद्यार्थिनींनी अनुभवले महासभेचे कामकाज
मनपा सभागृहात कशा पद्धतीने कामकाज चालते, हे जाणून घेण्यासाठी मंगळवारच्या सभेत आर.आर. विद्यालय व बेंडाळे महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सभागृहातील वातावरण, नगरसेवकांकडून उपस्थित हाेणारे प्रश्न, विषयांवर हाेणारी चर्चा याबाबत अनुभव घेतला. तसेच वाद-विवादही त्यांना पाहण्यास मिळाले. सभेनंतर महापौर ललित कोल्हे, सभागृह नेते रमेश जैन यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
 

बातम्या आणखी आहेत...