आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकांचे अाधी राजीनामे त्यानंतर दिला भाजपत प्रवेश, युती फिस्कटली?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका निवडणुकीत शनिवारी खऱ्या अर्थाने राजकीय रंग भरण्यात अाले. यात भाजपने अाघाडी घेत राष्ट्रवादी, खाविअा व मनसेला धक्का देत विद्यमान सात नगरसेवकांना पक्षात सामावून घेतले. नगरसेवकांना पक्षप्रवेश देण्यापूर्वी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी पदाचे राजीनामे अायुक्तांकडे पाठवण्यात अाले. तीन तासांच्या राजकीय घडामाेडीनंतर पक्षाकडून एकेक पत्ता उघडण्यात अाल्याने प्रचंड उत्सुकता अनुभवास अाली. दरम्यान, वजनदार नगरसेवकांचा पक्ष प्रवेश करवून घेण्यात येत असल्याने युती फिस्कटल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले अाहे. यासंदर्भात रविवारी घाेषणा हाेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली अाहे.

 

उमेदवारांची घोषणा
भाजपत प्रवेश केल्यानंतर कैलास सोनवणे यांनी प्रभाग क्रमांक २, ३ व ४ मधील भाजपच्या उमेदवारांची घोषणाच केली. यात प्रभाग क्रमांक दोन मधून माजी नगरसेवक अमोल सांगोरे, नगरसेविका गायत्री उत्तम शिंदे, कांचन विकास सोनवणे, उज्ज्वला बाविस्कर यांच्या परिवारातून उमेदवारी दिली जाणार आहे. तसेच प्रभाग क्रमांक तीन मधून नगरसेवक दत्तू कोळी, धुडकू सपकाळे, दिलीप बाविस्कर, भरत सपकाळे यांना तसेच प्रभाग क्रमांक चार मधून भारती सोनवणे, कैलास सोनवणे, किशोर चौधरी, श्रीकांत खटोड यांची उमेदवारी असेल, असे सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

शिवसेनेला पहिला धक्का
पिंप्राळ्यातील ३ नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर याच परिसरातील उमेदवार व शिवसेना शहर प्रमुख कुलभूषण पाटील यांचाही प्रवेश हाेणार असल्याची चर्चा सुरू झाली. कुलभूषण संपर्क कार्यालयात येत असल्याचेही सांगण्यात अाले; परंतु त्यांच्या एेवजी त्यांचे लहान बंधू पंकज पाटील यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे कुलभूषण पाटील यांचाही भाजप प्रवेश निश्चित मानला जात अाहे.

 

नगरसेवकांना प्रवेश : गिरीश महाजन
प्रवेश सोहळ्यानंतर मंत्री महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या १५ वर्षांत शहरात जे चालले आहे, त्याचा कंटाळा अाला अाहे. भाजपच्या हाती एकहाती सत्ता द्यायची अाहे. कुठलीही ठाेस कामे झालेली नाहीत. शहरातील विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा अाहे. म्हणूनच वजनदार नगरसेवकांना भाजपत प्रवेश करून घेतला जात अाहे. शहराचा महापाैर व एकहाती सत्ता भाजपचीच येईल. युतीचा निर्णय झालेला नाही. बाेलणी सुरू अाहे. दाेन दिवसांत मित्र पक्षांशी बाेलणी करू. युतीसंदर्भात पक्षात मतमतांतरे अाहेत. युती झाली तरी भाजपलाच बहुमत मिळेल. भाजपच माेठा पक्ष राहील. अामच्या जागा जास्त निवडून येतील व भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल, असा विश्वास महाजनांनी व्यक्त केला. युतीसाठी जागा वाटपावर चर्चा करू. निर्णय झाला तर ठिक अन्यथा अामच्या मार्गाने जाऊ, असे महाजन यांनी सांगितले.

 

पालकमंत्री करतील घाेषणा?
मंत्री महाजनांच्या म्हणन्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दाैऱ्यावर येत अाहे. या वेळी पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी बैठक हाेणार अाहे. यानंतर शिवसेनेसाेबत युती करायची की नाही? याबाबत अंतिम निर्णय हाेईल. या वेळी पाटील हे देखील युती फिस्कटल्याची घाेषणा करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...