आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा वाहतूक पाेलिस शाखेचा गाशा गुंडाळणार, गैरप्रकाराच्या तक्रारी; ड्यूटीचे नियोजन अवघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यासाठी चार वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या जिल्हा वाहतूक पोलिस शाखेचा गाशा लवकरच गुंडाळण्यात येणार आहे. गैरप्रकाराच्या तक्रारी आणि एकाच अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यांच्या ड्यूटीचे नियोजन अवघड होत चालल्याने जिल्हा वाहतुक शाखा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तेथील कर्मचाऱ्यांना विविध पोलिस ठाण्यांमध्ये वर्ग करण्यात येणार आहे. 


जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर गस्त घालण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी चार वर्षांपूर्वी म्हणजे सन २०१४ मध्ये जिल्हा वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वीच गोदावरी महाविद्यालयाजवळ एका दुचाकीस्वाराच्या तळहातावर स्वाक्षरी करून त्याच्याकडून ३०० रुपये उकळल्याचा प्रकार घडला होता. या संदर्भात 'दिव्य मराठी'ने वृत्त प्रसिद्ध करून पोलिसांच्या वसुलीकडे लक्ष वेधले होते. 

बातम्या आणखी आहेत...