आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारूप मतदारयाद्या पडताळणीवर खल; रहिवास एका प्रभागात, नाव दुसऱ्याच प्रभागात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात अालेल्या मतदारयाद्यांबाबत सर्वच प्रभागातून कमी अधिक प्रमाणात तक्रारींचा सूर व्यक्त हाेत अाहे. मतदारांना त्यांच्या नावाबाबत झालेल्या बदलाची जाणीव नसली तरी निवडणूक लढण्याची तयारी केलेल्या इच्छुकांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत अाहे. हरकतींनंतरही बदल न झाल्यास विजयाचे समिकरण कसे बदलू शकते ? याबाबत खल सुरू अाहे. 


प्रभाग रचनेनंतर नगरसेवक व निवडणुकीसाठी इच्छुकांनी मतदारयाद्यांवर लक्ष केंद्रीत केले अाहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा माेठ्या प्रमाणात मतदारयाद्यात बदल झाल्याने संतापाचे वातावरण अाहे. यंदा बहुसदस्यीय प्रभागांची रचना करण्यात अाली अाहे. दाेन प्रभाग मिळून एकाची निर्मिती झाली अाहे. त्यामुळे प्रभागाची लाेकसंख्या व मतदारांची संख्या वाढली अाहे. माेठ्या प्रभागात क्षेत्रफळाचा विचार करता इच्छुकांना निवडणुकीची तयारी करताना चांगलाच घाम गाळावा लागेल. तत्पूर्वी मतदार यादीतील नावांच्या घाेळामुळे चांगलाच कस लागत अाहे. प्रभागातील नागरीकांशी संपर्क अभियान राबवण्यावर भर दिला जात असताना सध्या रहीवास करत असलेले नागरीक हे अापले मतदारच नाहीत, याचा उलगडा झाल्यावर इच्छुकांचे टेंशन वाढले अाहे. तसेच मतदारयादीत समाविष्ट असलेली अनेक नावे ही प्रभागातील रहिवाशांची नसल्याने त्यांचा शाेध घ्यायचा कुठे? असा प्रश्न पडत अाहे. नगरसेवक व राजकीय पदाधिकाऱ्यांकडून पालिकेत हरकती नाेंदवल्या जात अाहेत. त्यावर याेग्य ताेडगा काढून प्रचाराचे नियाेजन कसे करायचे? याबाबतही अाता चर्चा रंगू लागल्या असल्याचे चित्र समाेर येत अाहे. 


तक्रार दाखल करणार 
महानगरपालिकेच्या सर्वच प्रभागांत कमी अधिक प्रमाणात मतदार यादीसंदर्भात तक्रारी वाढल्या अाहेत. रहिवास एका प्रभागात तर मतदारयादीत नाव दुसऱ्या प्रभागात असे प्रकार निदर्शनास अाले अाहे. म्हणून लाेकभावना तीव्र अाहेत. वैयक्तिक स्वरूपात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल करण्यात येणार अाहेत. महसूल यंत्रणेने काेणतीही दुरुस्ती न करता याद्या साेपवल्याने निर्माण झालेला हा गाेंधळ अाहे. 
- सुनील महाजन, गटनेते, खान्देश विकास अाघाडी 

बातम्या आणखी आहेत...