आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार याद्यांवरील हरकतींवर हाेणार 'स्पाॅट व्हेरिफिकेशन'; बैठकीत आयुक्तांच्या सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड घाेळ असल्याचे उघडकीस अाले अाहे. विराेधी भाजपासाेबतच अाता सत्ताधारी खाविअाने देखील मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत अाेरड सुरू केली अाहे. महापालिका अायुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चुकांचा पाढा वाचण्यात अाला. त्यामुळे प्राप्त हाेणाऱ्या हरकतींनुसार स्पाॅट व्हेरिफिकेशन करून मतदारांची खातरजमा केली जाणार अाहे. साेमवारी हरकतींचा पाऊस पडला असून तब्बल ६८९ तक्रारी दाखल करण्यात अाल्या अाहेत. 


महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये जुगलबंदी रंगण्यापूर्वीच प्रशासन विरूध्द लाेकप्रतिनिधी असा संघर्ष सुरू झाला अाहे. मतदार याद्यांमध्ये कमालीच्या चुका अाणि घाेळ असल्यामुळे संतापाचे वातावरण अाहे. मतदार यादीतील फेरफारप्रकरणी 'दिव्य मराठी' सातत्याने वृत्त प्रसिध्द करत अाहे. भाजपाने यापूर्वीच प्रशासनाच्याविराेधात टिकास्त्र साेडले अाहे. दरम्यान, वृत्तांची दखल घेत पालिकेतील सत्ताधारी खाविआनेही दंड थाेपटले अाहेत. अायुक्त चंद्रकांत डांगे यांच्या उपस्थितीत सायंकाळी सर्व अभियंत्याची बैठक बाेलाविण्यात अाली हाेती. या बैठकीला महापाैर ललित काेल्हे, सभागृह नेते नितीन लढ्ढा, गटनेते सुनील महाजन, नितीन बरडे, शामकांत साेनवणे, कुलभूषण पाटील, अतुल बारी यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित हाेते. 


अातापर्यंत ७४९ हरकती दाखल 
गुरुवारपासून हरकती दाखल करण्यास सुरुवात झाली अाहे. गुरुवारी १५, शुक्रवारी ४५ तर साेमवारी तब्बल ६८९ हरकती अशा अातापर्यंत ७४९ हरकती दाखल झाल्या अाहेत. त्यात प्रभाग क्रमांक २ मध्ये १२१, प्रभाग क्रमांक १४ मध्ये २२२, प्रभाग क्रमांक १६ मध्ये ५४, प्रभाग क्रमांक ९ मध्ये ५२ अशा सर्वाधिक हरकती दाखल झाल्या. 


अभियंत्याच्या कारभारावर टीका 
प्रभाग रचनेच्या मंजुरीनंतर मतदार याद्यांसंदर्भात अभियंत्यांनी प्रभागाच्या सीमा तपासल्या हाेत्या. त्यात मतदारांची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच प्रभाग निहाय याद्या तयार करण्यात अाल्या. त्यानंतरही प्रभागातील मतदारांच्या नावांचा घाेळ कसा काय झाला? असा प्रश्न उपस्थित करण्यात अाला अाहे. विधानसभेच्या याद्यांचा अभ्यास न करताच महसूल विभागाने पालिकेकडे याद्या पाठविल्याचा खुलासा करण्यात अाला अाहे. दरम्यान, मतदार याद्यांसंदर्भात प्राप्त हाेणाऱ्या हरकतींबाबत अभियंत्यांनी प्रत्यक्ष मतदारांची पडताळणी करावी अशी मागणी करण्यात अाली. 


जागेवर जाऊन करणार चाैकशी 
सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बाजू एेकूण घेतल्यानंतर अायुक्त डांगे यांनी सर्व अभियंत्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन मतदारांची पडताळणी करण्याची सूचना केली अाहे. मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक अायाेग जाहीर करते. त्यानुसार मतदार यादी जाहीर करण्याची जबाबदारी अाहे. त्यापूर्वी हरकतींची चाैकशी करण्यावर भर दिला जाणार अाहे. त्यासंदर्भात अायाेगाकडे प्रस्ताव दे‌खील देणार अाहे. हरकतींसाेबत रहिवास पुरावा द्यावा अथवा मतदाराचा पूर्ण पत्ता दिल्यास खातरजमा करणे शक्य हाेणार असल्याचे अायुक्त डांगे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...