आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्याने उन्हाळा भारनियमनमुक्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सध्या मागणीच्या तुलनेत पुरेशी वीज उपलब्ध अाहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा भारनियमनमुक्त राहणार असल्याचे संकेत महावितरण कंपनीकडून दिले जात आहेत. यासाठी कंपनीने ग्राहकांनी वीज थकबाकी भरण्याचे व चोरी न करण्याचे अावाहन करून सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली अाहे. 


उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्याने विजेचा वापर वाढला अाहे. मार्च महिन्यातच विजेची मागणी ही १८हजार ६८८ मेगावॅट पर्यत पोहचली आहे. ही मागणी एप्रिल, मे महिन्यात २० हजार मेगावॅट पर्यत पोहचेल. सद्य:स्थितीत विजेची तुट नसल्याने वीज भारनियमन केले जात नाही. उन्हाळ्यात वीज निर्मितीचे प्रमाणही खालावते. त्यामुळे खासगी वीज विकत घेतली जाते; पण सद्य:स्थितीत वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे; मात्र तापमान वाढीने तांत्रिक बिघाडच्या घटना वाढल्यास अाणि वीज नििर्मती व मागणीत तफावत निर्माण झाल्यास 'जी' ग्रुपवरील फीडरवर भारनियमन अटळ असल्याचेही महावितरण कंपनीने सांगितले. 


थकबाकी वसुली जाेरात 
महावितरण कंपनीतर्फे ग्राहकांकडील वीजबिल थकबाकी वसुली जोराने सुरु आहे. वेळप्रसंगी थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडीत करण्याचीही कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे नियमित बिले भरणाऱ्या ग्राहकांना उन्हाळ्यात भारनियमनाचे भूत कायम राहील का? याची चिंता सतावत आहे. पण महावितरण कंपनीच्या भारनियमनमुक्तीच्या दाव्यामुळे ग्राहकांना उन्हाळ्यात माेठा दिलासा मिळणार आहे. 


सद्य:स्थितीत विजेची तुट शून्य 

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांकडून थकबाकीसाठी सक्तीची वसुली केली जात आहे. वीजनिर्मिती व खरेदीसाठी अधिक खर्च येतो. त्या तुलनेत वसुली होत नाही. सद्य:स्थितीत विजेची उपलब्धी पुरेशी आहे; मात्र, वीजचोरी नियंत्रणात आणून वीजबिले भरण्याची मानसिकता ग्राहकांनी ठेवल्यास उन्हाळ्यात भारनियमनमुक्तीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बी. के. जनवीर, मुख्य अभियंता महावितरण 

बातम्या आणखी आहेत...