आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या प्रारुप मतदार यादीत घाेळ; दाेन हजार नावे मूळ यादीतून गायब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ताेंडावर असल्याने राजकीय वातावरण तापले अाहे. प्रभाग रचनेतील बदलाच्या विषयावरून प्रशासनावर टीकेचे अासूड अाेढले जात असताना प्रारुप मतदार यादीतील घाेळाची भर पडली अाहे. प्रभाग क्रमांक ८ ते ११ मधील दाेन हजार मतदारांची नावे मूळ यादीतून वगळण्यात अाली अाहेत. विद्यमान नगरसेविका व गेल्या निवडणुकीत उमेदवारी केलेल्या प्रतिनिधींची नावे गायब अाहेत. अभियंत्यांनी एका खाेलीत बसून मतदार यादी तयार केल्याचा गंभीर अाराेप करत लाेकप्रतिनिधींनी गुरुवारी पालिका उपायुक्त चंद्रकांत खाेसे यांना घेराव घातला. 


राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका व हुडकाेतील रहिवासी मुख्तारबी रसूल पठाण यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांची नावे गायब झाली अाहेत. नवीन प्रभाग रचनेनुसार सध्या प्रभाग १०मध्ये निवास असताना त्यांचे नाव प्रभाग क्रमांक ९मध्ये घुसवण्यात अाल्याचा अाराेप करण्यात अाला. याच प्रभागातील रहिवाशांची नावे अन्य प्रभागांमध्ये टाकण्यात अाली असून मतदारांना नाव शोधताना एकाच वेळी तीन ते चार प्रभागांच्या याद्या शाेधाव्या लागत अाहेत. हुडकाेतील सुमारे दाेन ते अडीच हजार मुस्लिम मतदारांची नावे प्रभाग १० ऐवजी ९मध्ये टाकण्यात अाल्याचा अाराेप जाकीर पठाण यांनी केला अाहे. प्रभाग रचनेतील बदलानंतर भारतीय जनता पक्षाने थेट महापालिका प्रशासन व खाविअाच्या नेत्यांवर अाराेपांच्या फैरी झाडल्या हाेत्या. त्यात मतदार यादीतही घाेळ होईल, असे भाकीत केले हाेते. दाेन दिवसांपूर्वीच प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली अाहे. प्रभागनिहाय मतदार यादीतील चुकांचा अभ्यास केल्यानंतर अाता पालिकेत मतदार यादीत दुरुस्तीसाठी गर्दी हाेऊ लागली अाहे. उपायुक्तांच्या कार्यालयात मतदार यादीसंदर्भात हरकती स्वीकारण्यास येत असून गलथान कारभारावर टीकास्त्रही साेडले जात अाहे.


खंडपीठात धाव घेणार 
मुक्ताईनगरातील रहिवासी व गत निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी केलेल्या नर्मदाबाई जिजाबराव पाटील व त्यांच्या पतीचे नाव मतदार यादीतून गायब करण्यात अाल्याचा अाराेप सागर पाटील यांनी केला. प्रभाग क्रमांक ८मध्ये नावांचा समावेश करावा, यासाठी थेट अाैरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे सागर पाटील यांनी सांगितले. 


विराेधी पक्षनेत्यांची हरकत 
महापालिकेचे विराेधीपक्षनेते वामनराव खडके यांनीही उपायुक्त खाेसे यांची भेट घेतली. त्यांच्या प्रभागातील शेकडाे नावे प्रभाग ३ मध्ये समाविष्ट अाहेत. ती पुन्हा प्रभाग १७ मध्ये समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात लेखी हरकत घेतल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाणार अाहे. खडकेंच्या घराजवळील खडके व काेल्हे वाड्यातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केल्याचे खडकेंचे म्हणणे अाहे. 


अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी 
मतदार यादीतील घाेळाला संबंधित अभियंते जबाबदार असल्याचा अाराेप अाहे. अभियंत्यांनी घरपट्टीच्या कर्मचाऱ्यांना साेबत घेत एकाच ठिकाणी बसून यादी तयार केल्याचा अाराेप करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात अाली. अभियंते अमृतकर, प्रकाश पाटील, याेगेश बाेराेले अादींनी प्रभाग सीमेवर न जाता एका खाेलीत बसून यादी अंतिम केल्याचा दावा तक्रारदारांनी केला. 


प्रभाग १७मध्ये जास्त हरकती 
उपायुक्तांच्या दालनात हरकती स्वीकारल्या जात अाहेत. यात तिसऱ्या दिवशी हरकती दाखल करण्यास सुरूवात झाली. प्रभाग क्रमांक ४ संदर्भात ३ हरकती, प्रभाग ६ संदर्भात दाेन तर प्रभाग १७ मधून १० अशा एकूण १५ हरकती तीन दिवसांत दाखल झाल्या अाहेत. 


घराेघरी जावून नावांची खातरजमा करू 
मतदार यादीसंदर्भात महानगरपालिकेत दाखल हाेणाऱ्या प्रत्येक हरकतीसंदर्भात संबंधित अभियंता व प्रभाग अधिकारी यांच्यामार्फत खात्री केली जाईल. हरकतीतील नावांची खातरजमा करून त्यावर निर्णय घेतला जाणार असून घराेघरी जावून बदल केला जाईल. एकाही मतदारावरअन्याय हाेऊ देणारनाही. 
- चंद्रकांत खाेसे, उपायुक्त, महानगरपालिका, जळगाव 


१५०० फाॅर्मपैकी २५० नावे समाविष्ट 
मतदार यादीत नाव नाेंदणीसाठी २१ मे पूर्वी मुक्ताईनगर परिसरातील १५०० रहिवाशांचे फाॅर्म भरून तहसील कार्यालयात जमा केले हाेते. परंतु, त्यापैकी केवळ २५० नावांचा समावेश करण्यात अाला अाहे. याबाबत विचारणा केली असता जेवढ्या फाॅर्मचा तपशिल नाेंदवण्यात अाला, तेवढ्याच मतदारांची नावे समाविष्ट झाल्याचा अजब खुलासा प्रशासनाकडून करण्यात अाला अाहे. २१ मे पूर्वी फाॅर्म दिलेले असतानाही मतदार यादीत नावे न समाविष्ट झाल्याने संताप व्यक्त केला जात अाहे. या राेषाचा उद्रेक हाेण्याची चिन्हे अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...