आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षा कलंडल्याने महिलेचा जागीच मृत्यू, रिक्षा चालकाविराेधात पाेलिस ठाण्यात गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - भरधाव पॅजो रिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडल्याने रिक्षातील महिला जागीच ठार झाली. पाटणादेवी रस्त्यावरील बायपास चौफुलीजवळ रविवारी सायंकाळी ही घटना घडली. 

चंद्रभागाबाई लुका खुटे (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे. चंद्रभागाबाई या रविवारी सायंकाळी ५.३० वाजता चाळीसगावकडून पाटणादेवीकडे पॅजाे रिक्षाने (क्र. एम.एच. १९ ए.ई. ९४४८) निघाल्या होत्या. घराकडे परतत असताना बायपास चौफुलीजवळ रिक्षा पोहचली असता चालक आसिफ शेख जाकीर याचा ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात कलंडली. 


या अपघातात चंद्रभागाबाई ताटे यांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस हवालदार मिलींद शिंदे करीत आहेत. महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. 

बातम्या आणखी आहेत...