आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर ४० रुपये टाकून भामट्याने चारचाकीमधून लांबवला लॅपटॉप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रस्त्यावर ४० रुपये टाकून एका चारचाकीत बसलेल्या व्यक्तीस ते उचलण्यास सांगून भामट्याने चक्क चारचाकीतील मागच्या सीटवर ठेवलेला २३ हजार रुपयाचा लॅपटॉप लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री ७ वाजता नवीपेठेतील इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ घडली. याप्रकरणी बुधवारी शहर पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे. 


जैन इरिगेशन सिस्टीममधील कनिष्ठ व्यवस्थापक पनीरसेल्वम मुनियान्डी (वय ४८) यांच्यासोबत हा प्रकार घडला. त्यांच्यावर परराष्ट्रात ठिबक नळ्या विक्रीची जबाबदारी आहे. ते जुलै २०१७ पासून रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजमध्ये राहतात. सोमवारी ते मित्र अभयकुमार बऱ्हाटे (रा.मुंदडानगर) यांच्यासोबत त्यांच्या चारचाकीने (क्रमांक एमएच १९ बीजे ०८४३) रूमवर जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी नवीपेठेतील गणेश मंदिराजवळ पाणीपुरी खाण्यासाठी गाडी थांबवली. या वेळी बऱ्हाटे हे गाहीतून खाली उतरले. तर पनीरसेल्वम हे चारचाकीत बसून होते. त्यांनी लॅपटॉप असलेली बॅग चारचाकीच्या मागील सीटवर ठेवलेली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यांनी चारचाकीचे काच उघडे ठेवलेले होते. याचवेळी एक भामटा त्यांच्याजवळ आला 'तुम्हारे पैसे निचे गीर गये,' असे सांगून तो भामटा पुढे निघून गेला. पनीरसेल्वम यांनी खाली वाकून पाहिल्यानंतर त्यांना १० रुपयांच्या नोटा पडलेल्या दिसून आल्या. मित्राचे पैसे असतील, असे समजून ते पैसे उचलण्यासाठी ते गाडीतून खाली उतरले. तितक्यात दुसऱ्या एका भामट्याने गाडीच्या मागील सीटवर ठेवलेले लॅपटॉप लंपास केला. 


पोलिसांनी तपासले सीसीटीव्ही फुटेज 
पानीपुरी खाल्यानंतर बऱ्हाटे यांच्यासोबत सेल्वम हे रूमवर जाण्यासाठी निघाले. लॉजजवळ उतरल्यानंतर त्यांना मागील सीटवर लॅपटॉप नसल्याचे आढळून आले. तेव्हा घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी बुधवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत.

बातम्या आणखी आहेत...