आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ नसल्याने मागील वर्षाचे कर्ज माफ हाेणार नाही, महसूलमंत्र्यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ पर्यंत कर्जमाफी देण्याची घाेषणा केली असली तरी प्रत्यक्षात ती अमलात येण्याची शक्यता दिसत नाही. त्यातच महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी सोमवारी दिलेल्या माहितीने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा उठला आहे. पाटील म्हणाले, ‘सरकारची इच्छा असली तरी २०१६-१७ या वर्षातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही. कर्जमाफी देण्यासाठी सतत दोन वर्षे दुष्काळी असणे आवश्यक आहेत. या अटीमुळे रिझर्व्ह बँकेने मागील वर्षाची कर्जमाफी मान्य केलेली नाही.’


कर्जमाफीच्या अंमलबजावणीस दिरंगाईमुळे २०१६-१७ या वर्षातही शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. कर्जमाफीसाठी किसान सभेने काढलेल्या मोर्चाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी २०१६-१७ या वर्षातील थकबाकीदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचे आश्वासन विधानसभेत दिले होते. त्याचे काय झाले, असा प्रश्न आमदार किशोर पाटील यांनी सोमवारी झालेल्या खरीप आढावा बैठकीत उपस्थित केला होता.

 

अाश्वासन दिलेच नाही
- मंत्री पाटील म्हणाले, ‘२००१ ते २००९ या कालावधीत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मान्य केली आहे. त्यांना कर्जमाफी मिळेलच. मात्र, २०१६-१७ वर्षातील थकबाकीदारांबाबत चुकीचा अर्थ लावण्यात येऊ नये. या शेतकऱ्यांची कर्जमाफी मान्य नाही.
- सतत दाेन वर्षांचा दुष्काळ असेल तरच कर्जमाफी देता येते, असा नियम अाहे. त्यामुळे या वर्षात कर्जमाफी देता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी तसे अाश्वासन दिलेले नाही.

 

अाधी हाेकार : २०१६-१७ वर्षामधील थकबाकीदारांना कर्जमाफीचे सीएमचे अाश्वासन.
अाता नकार : चुकीचा अर्थ लावू नये. या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी अमान्य.
कारण : कर्जमाफीसाठी सतत २ वर्षे दुष्काळी असणे आवश्यक असल्याची रिझर्व्ह बँकेची अट.

 

हेही वाचा,
कर्जमाफी : दावा 34 हजार कोटी रुपयांचा, प्रत्यक्षात अाजवर दिले 18 हजार कोटीच

बातम्या आणखी आहेत...