आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पादचारी वृद्धेच्या दोन्ही पायांवरून गेला भरधाव पेट्राेलचा टँकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-कासमवाडीत डॉक्टरांकडे उपचार करून घरी परतणाऱ्या वृद्धेला शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या भरधाव पेट्रोलच्या टँकरने धडक दिली. तर या धडकेमुळे रस्त्यावर पडल्यानंतर टँकरची चाके वृद्धेच्या दोन्ही पायांवरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या अाहेत. 


या अपघातात सागरबाई मोरसिंग पवार (वय ६५, मूळ रा. सांडसकला, जि. बऱ्हाणपूर) या गंभीर जखमी झाल्या आहेत. सागरबाई यांना संधिवाताचा त्रास आहे. त्यावर उपचार करण्यासाठी त्या कासमवाडीतील खासगी डॉक्टरांकडे गेल्या होत्या. उपचार करून परतत असताना नेरी नाक्याजवळ पेट्रोलने भरलेल्या टँकरने त्यांना धडक दिली. त्यामुळे त्या रस्त्यावर पडल्या. त्यानंतर त्यांच्या दोन्ही पायांवरून टँकरची चाके गेली. यामुळे त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. सागरबाई यांचा मुलगा रतन पवार हा पालिकेसमोर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वॉचमन आहे. दरम्यान, अपघातानंतर एमआयडीसी पोलिस सागरबाई यांचा जबाब घेण्यासाठी जिल्हा रूग्णालयात गेले होते. 
 

बातम्या आणखी आहेत...