आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्‍नासाठी जात असलेल्‍या दुचाकीस्‍वाराचा कंटेनरच्‍या अपघातात जागीच मृत्‍यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव (यावल)-  शहरातून जाणा-या अंकलेश्‍वर-बुरहानपूर राज्‍य मार्गावर कंटेनरच्‍या धडकेत दुचाकीस्‍वाराचा जागीच मृत्‍यू झाला आहे. आज मंगळवारी सकाळी 11 वाजेच्‍या सुमारास ख्‍वाजा मशिदीजवळ हा अपघात झाला. माधव दगडू पाटील (77) असे अपघातात मृत्‍यूमुखी झालेल्‍या ज्‍येष्‍ठ दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. ते भुसावळ तालुक्‍यातील वराडशिम येथील रहिवासी आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, माधव पाटील हे आपल्‍या दुचाकीवरुन (क्र. एम. एच. १९ बी.पी. ४५९५) विरावली येथे लग्‍नासाठी जात होते. त्‍याचवेळी एक कंटेनर (एच. आर. 61 बी. 1384)   चोपडा येथून शहरात दाखल झाला. तेव्‍हा सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ असलेल्‍या ख्‍वाजा मशिदीजवळ दुचाकी व कंटेनरचा अपघात झाला. यामध्‍ये माधव पाटील हे जागीच ठार झाले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनास्‍थळावरील फोटो...

बातम्या आणखी आहेत...