आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्‍ये अज्ञात दुचाकीस्‍वाराच्‍या धडकेत एकजण गंभीर जखमी, दुचाकीस्‍वार फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - अज्ञात दुचाकी स्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकीस जबर धडक दिल्याने एक 55 वर्षीय व्‍यक्‍ती गंभीर जखमी झाला आहे. गुरूवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास यावल – विरावली रस्त्यावर हा अपघात झाला आहे. जखमीस ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले आहे.

 

पिंताबर आधार निळे असे जखमीचे नाव असून ते विरावली येथील रहिवासी आहेत. गुरूवारी रात्री ते यावल शहरातुन काम आटोपून दुचाकीवरून विरावली कडे निघाले होते. दरम्यान विरावली कडून यावलकडे भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना जबर धडक दिली व  अपघातानंतर पळ काढला. या अपघातात निळे यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना काही नागरीकांनी ग्रामीण रूग्णालयालय दाखल केले. येथे त्‍यांच्‍यावर प्रथमोपचार करण्‍यात आले. मात्र प्रकृती अधिक खालवल्याने त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्‍या त्‍यांची प्रकृती गंभीर असून त्‍यांच्‍यावर उपचार सुरू आहेत.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

 

 

बातम्या आणखी आहेत...