आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतिराेधकावर माेहाडीचा दुचाकीस्वार घसरला; पाठीमागच्या डंपरने चिरडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील कामे अाटाेपून घराकडे परतताना जामनेर तालुक्यातील माेहाडीचा दुचाकीस्वार शेतकरी पावसामुळे चिंचाेली बसस्थानक -जवळच्या गतिराेधकावर घसरून पडला. रस्त्यावरील नागरिकांनी पाठीमागून येणाऱ्या डंपरचालकाला जाेरजाेरात अावाज देऊन थांबण्याचे सूचित केले. परंतु, ताेे गाणी एेकण्यात दंग असल्याने त्यात दुचाकीस्वार चिरडला गेला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता जळगाव-चिंचाेली रस्त्यावर घडली. 


जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील शेतकरी भारत बागुल (वय ३७) हे शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास डिझेल आणण्यासाठी जातो, असे कुटुंबीयांना सांगून कॅन घेऊन दुचाकीवर गेले होते. परंतु, खासगी कामानिमित्त ते जळगाव शहरात आले होते. त्यानंतर सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मोहाडी येथे परत जाण्यासाठी दुचाकीने (एमएच- १९, सीपी- ६०१५) निघाले. रेमंड चौफुलीजवळ त्यांना गावातील वर्गमित्र भेटला. त्यांना भेटल्यानंतर ते पुढे निघाले. दुचाकीवर जात असताना पाऊस सुरू होता. जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळील गतिरोधकावर तोल जाऊन दुचाकी घसरल्याने ते रस्त्यावर कोसळले. याचदरम्यान पाठीमागून वाळू भरलेला डंपर (एमएच- १९, झेड- ५२७५) येत होता. डंपरचालक गाणी ऐकण्यात गुंग होता. चिंचोली बसस्थानकावर उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी जोरजोरात ओरडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो गाणी ऐकण्यात गुंग असल्याने त्याला ऐकू आले नाही. त्यामुळे भरधाव डंपरने दुचाकीवरून काेसळलेल्या शेतकऱ्यास चिरडले. डंपरचे चाक पाेटावरून गेल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 


चालक पाेलिसांच्या ताब्यात 
अपघातानगर संतप्त ग्रामस्थांनी डंपरचालकास पकडून चोप देऊन एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. विवेक दिनकर सपकाळे (रा. खेडी) असे डंपरचालकाचे नाव आहे. अपघातग्रस्त डंपर व दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच मृत भारत यांचे वडील शालिक बागुल व मोहाडी येथील ग्रामस्थ जिल्हा रुग्णालयात आले. त्यांनी तेथे आक्रोश केला. मृत भारत यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...