आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोलेराेने तीस मीटर फरपटत नेले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा- तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे झालेल्या भीषण अपघातात बोलेरोने दुचाकीस्वाराला तीस मीटर फरपटत नेले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. आत्माराम चुनीलाल पाडवी (वय ५०) असे मृताचे नाव आहे. या अपघातात एक युवती जखमी झाली आहे. 


तळोद्याहून धडगावला बोलेरो (क्र. एमएच ३९ एबी ००५२) जात होती. त्याच वेळी तालुक्यातील आंबागव्हाण येथील आत्माराम चुनीलाल पाडवी हे मुलगी मंदा आत्माराम पाडवी (वय २०) हिच्यासह मोटारसायकलने (क्र. एमएच ३९ एक्स ४८५०) तळोदा येथील दवाखान्यात जात होते. या वेळी तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे बोलेरो व मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. बोलेरोने पाडवी यांना तीस मीटर फरपटत नेले. त्यानंतर आत्माराम पाडवी व त्यांची मुलगी मंदा पाडवी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडले. या अपघातात आत्माराम पाडवी यांच्या डोक्यासह कपाळ व दोन्ही हात, पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मंदा पाडवी हिच्या पायाला गंभीर इजा झाली. तिला नंदुरबार येथील रुग्णालयात हलविले. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक यादव भदाणे, युवराज चव्हाण, रामदास पावरा, तारसिंग वळवी, जगमसिंग वसावे यांनी भेट दिली. याबाबत तळोदा पोलिस ठाण्यात अशोक सखाराम पाडवी (रा. लक्कडकोट, ता. तळोदा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बोलेरो चालक गुलाब बोगता पावरा (रा. हरणखुरी, ता. धडगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तो मद्यप्राशन करून विरुद्ध दिशेने वाहन चालवत होता, असे तक्रारीत नमूद आहे. 


दोघांनी घेतला जगाचा निरोप 
अपघातात ठार झालेेले आत्माराम पाडवी यांच्या पत्नी जयतीबाई आत्माराम पाडवी यांचे २० एप्रिल रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर दहा दिवसांतच आत्माराम पाडवी यांचाही अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...