आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखली नदीत बुडून गुराख्याचा मृत्यू, गुरे बाहेर काढताना दुर्घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर (जळगाव)​ - तालुक्यातील कुर्हे खु शिवारात असलेल्या चिखली नदीत बुडून एका व्‍यक्‍तीचा मृत्यू झाला आहे. आज सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. शांताराम पाटील (55) असे मृत व्‍यक्‍तीचे नाव आहे.  

 

नगाव येथील रहिवासी शांताराम गिरीधर पाटील हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी कुर्हे खु शिवारात गेले होते. यावेळी या शिवारात  असलेल्या चिखली नदीत गुरे उतरली. गुरे नदीतून बाहेर काढण्यासाठी तेदेखील नदीत उतरले. मात्र यावेळी खोल खड्ड्यात पाय गेल्याने ते बुडाले. ही घटना पाहताच एकाने आरडाओरड केली होती. मात्र त्‍यांना वाचवण्‍यात यश आले नाही. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...