आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाडा हत्‍याकांड: आणखी एका मुख्‍य आरोपीला अटक, हत्‍येनंतर तपासली होती भिक्षुकांची नाडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ क्लिपमधील गांधी टोपी घातलेल्‍या आरोपीला पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. - Divya Marathi
व्हिडिओ क्लिपमधील गांधी टोपी घातलेल्‍या आरोपीला पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे.

पिंपळनेर-  राईनपाडा हत्याकांडप्रकरणी गेल्‍या 5 दिवसांमध्‍ये महारू पवार, हिरालाल गवळी व दशरथ काळग्या पिंपळसे या मुख्य सुत्रधारांसह 25 जणांना अटक करण्‍यात आली आहे. दशरथ याला जंगलातून रविवारी (8 जुलै) रोजी दुपारी ताब्यात घेण्‍यात आले. 1 जुलै रोजी दशरथनेच पाचही मृतांवर क्रूरतेने घणाघाती वार केले होते. त्‍यानंतर रविवार रात्री गुलाब रामा पाडवी (55) या आरोपीलाही चौपाळा शिवारातून पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.

 

गुलाब पाडवी याने गांधी टोपी व अंगावर टॉवेल परिधान केल्याचे व्हायरल क्लिप मध्ये स्पष्टपणे दिसत होते. हत्‍येनंतर पाचही भिक्षुकांची नाडी गलाब पाडवी यानेच तपासली होती व मृत्यू झाला की नाही याची खात्री करून घेतली होती. राईनपाडा सामूहिक हत्याकांड प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांचे पथक जवळील जिल्यासह इतर सीमालगत राज्यातही रवाना झाले आहेत. तपास कार्यात एलसीबीची मदत घेतली जात आहे. 

 


पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

 

बातम्या आणखी आहेत...