आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी'च्या अाॅनलाइन परीक्षेमुळे इच्छुक उमेदवारांची निवड हाेणार साेपी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहराचा किमान अभ्यास अन् माहिती असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देऊन महापालिकेच्या सभागृहात पाठवण्यासाठी 'दिव्य मराठी'ने अायाेजित केलेली अाॅनलाइन पात्रता परीक्षा महत्त्वाची ठरणार अाहे. मतदारांसह राजकीय पक्षांना या परीक्षेमुळे उमेदवारांची निवड करणे साेपे हाेणार असल्याच्या प्रतिक्रिया येत अाहेत. राजकीय पक्षांनी या परीक्षेचे स्वागत करत अापल्याकडे उमेदवारी मागू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ही परीक्षा देण्याचे अावाहन केले अाहे. रविवारी सकाळी १० वाजता केसीई अभियांत्रिकी-मणियार विधी महाविद्यालयाच्या इमारतीत ही परीक्षा घेण्यात येणार अाहे. 


पालिकेसाठी उमेदवार निवडून देताना नेहमीच मतदारांचा संभ्रम हाेत असताे. अापण निवडून दिलेला उमेदवार याेग्य अाहे की नाही? त्याला अापला प्रभाग, शहराची माहिती अाहे किंवा नाही? ताे प्रभावीपणे शहराचे प्रश्न मांडू शकेल की नाही? याबाबत मतदारांच्या मनात नेहमीच संभ्रम असताे. हा संभ्रम दूर न झाल्यामुळे काही लाेक मतदानापासून लांब राहणे पसंत करतात, तर काही दगडापेक्षा वीट मऊ म्हणून मतदान करतात. मतदारांचा हा संभ्रम काही प्रमाणात दूर करण्यासाठी 'दिव्य मराठी'ने इच्छुक उमेदवारांची पात्रता कळावी म्हणून रविवारी 'जेएमसी -सीईटी' परीक्षेचे अायाेजन केले अाहे. 


अशी असेल प्रश्नपत्रिका 
महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर नगरसेवकाकडून ज्या किमान माहितीची अपेक्षा केली जाते, त्या माहितीवर आधारित ५० प्रश्न अाॅनलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत विचारले जाणार अाहेत. ५० प्रश्नांची अाॅनलाइन परीक्षा बहुपर्यायी असून उमेदवारांना केवळ प्रश्नापुढे दिलेल्या याेग्य उत्तरावर क्लिक करावे लागणार अाहे. नगरसेवकांचे अधिकार, कर्तव्य, सभागृहाच्या कामकाजाची पद्धत, शहराची सामान्य माहिती, शहराचे प्रमुख प्रश्न, महानगरपालिकेतील समित्या, अार्थिक स्त्राेत, विकासाच्या विविध याेजना अाणि महापालिकेशी संबंधित सामान्य माहितीवर प्रश्न देण्यात येणार अाहेत. स्थानिक माहितीवर अाधारित प्रश्न देण्यात अाल्यामुळे उमेदवारांना त्या दृष्टीने तयारी करता येईल. 


राजकीय पक्षांकडून स्वागत 
'दिव्य मराठी'ने अायाेजित केलेल्या 'जेएमसी-सीईटी' परीक्षेचे सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केले अाहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, खान्देश विकास अाघाडी, महानगर विकास अाघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पक्ष, अाम अादमी पार्टी, एमअायएम या पक्ष अाणि अाघाड्यांनी 'दिव्य मराठी'च्या या उपक्रमाचे स्वागत करत अापल्या इच्छुक उमेदवारांना देखील ही परीक्षा सक्तीची केली अाहे. 


येथे हाेईल परीक्षा 
केसीई साेसायटीच्या केसीई अभियांत्रिकी, मणियार विधी महाविद्यालयाच्या इमारतीत ८ जुलै राेजी सकाळी १० वाजता अाॅनलाइन पद्धतीने ही परीक्षा हाेईल. इच्छुक उमेदवार थेट परीक्षेपूर्वी अर्धा तास अाधी म्हणजेच ९.३० वाजेपर्यंत नाेंदणी करू शकतील. एसएनडीटी महाविद्यालयाशेजारी असलेल्या केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात जाण्यासाठी महामार्गावरून मुलींचे अायटीअाय, अायएमअार काॅलेज रस्त्याने येऊ शकतात. मणियार विधी महाविद्यालयाच्या पटांगणात वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात अाली अाहे. गणेश काॅलनी, ख्वाजामियांॅ चाैकातून अाणि रिंगराेडने परीक्षा केंद्रावर येण्यासाठी मार्ग अाहे. 


माेबाइलवरही देता येणार परीक्षा 
परीक्षा केंद्रावर उमेदवारांना संगणकाशिवाय इच्छेप्रमाणे अापल्या माेबाइलवरही ही अाॅनलाइन परीक्षा देता येणार अाहे. परंतु, यासाठी परीक्षा केंद्रावर येणे अावश्यक असेल. 'दिव्य मराठी'कडे नाेंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर अाल्यानंतर वर्गात बसून माेबाइलवर लिंक दिली जाईल. या लिंकमध्ये नाेंदणी नाव, माेबाइल क्रमांक अाणि प्रभाग क्रमांक नाेंदणी केल्यानंतर अाॅनलाइन प्रश्नपत्रिका साेडवता येणार अाहे. परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना अापली अाेळख पटवण्यासाठी स्वत:चे अाधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना यापैकी काेणताही एक पुरावा साेबत अाणणे अावश्यक अाहे. 

बातम्या आणखी आहेत...