आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी'ची १०० गुणांची अाॅनलाइन परीक्षा; महापालिका निवडणूकीत इच्छुक उमेदवार देणार पेपर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांची 'दिव्य मराठी'तर्फे रविवारी १०० गुणांची अाॅनलाइन परीक्षा घेण्यात येत अाहे. सकाळी १० वाजता केसीई इंजिनिअरिंग काॅलेजमध्ये ही परीक्षा हाेईल. यात ५० प्रश्नांची उत्तरे परीक्षार्थींना साेडवावे लागतील. प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतील. परीक्षा देण्यासाठी इच्छुक उमेदवारांना व्हाॅट्सअॅपवरही नाेंदणी करता येणार अाहे. 


महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली अाहे. सर्वच राजकीय पक्षांनी तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू केला अाहे. यासाठी इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात अाल्या अाहेत. अशा सर्व इच्छुकांची अाॅनलाइन परीक्षा या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'दिव्य मराठी' घेत अाहे. जळगावकरांसाठी महापालिकेच्या सभागृहात नागरी समस्यांची जाण, नेतृत्व गुण, कायद्याचे ज्ञान असलेला उमेदवार निवडून जाणे अपेक्षित अाहे. या निकषांपैकी किती गुण इच्छुक उमेदवारांत अाहेत, हे तपासण्यासाठी 'दिव्य मराठी'तर्फे ही अाॅनलाइन परीक्षा घेण्यात येत अाहे. 


नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. काेणत्याही प्रमुख पक्षाचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या सर्वच इच्छुकांना ही परीक्षा देता येईल. विद्यमान सर्व नगरसेवकांनाही ही परीक्षा देता येणार अाहे. राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांची एकत्रित यादी 'दिव्य मराठी' कार्यालय, नवीपेठ (जळगाव) येथे शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जमा करावी. 'दिव्य मराठी'च्या या उपक्रमास केसीई इंजिनिअरींग काॅलेजचेही सहकार्य लाभत अाहे. 


कशी हाेईल परीक्षा 
महापालिका निवडणुकीतील इच्छुकांची ही अाॅनलाइन परीक्षा केसीई इंजिनिअरिंग काॅलेजच्या संगणक प्रयाेगशाळेत रविवारी सकाळी १० वाजता हाेणार अाहे. जर उमेदवारांची संख्या जास्त झाली तर दाेन टप्प्यात ही परीक्षा हाेईल. इच्छुक उमेदवारांना परीक्षेच्या किमान २० मिनिटे अाधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अपेक्षित अाहे. याठिकाणी 'दिव्य मराठी'तर्फे त्यांना परीक्षेचे स्वरुप व अासन क्रमांक देण्यात येईल. ताे क्रमांक उमेदवारांनी प्रश्नपत्रिकेवर टाकावा. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप हे बहुपर्यायी असून चार पर्यायातून एक पर्याय उमेदवारांना निवडायचा अाहे. १०० गुणांच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेत ५० प्रश्न असतील. ते साेडवण्यासाठी ६० मिनिटांचा वेळ देण्यात येणार अाहे. 


परीक्षा: ८ जुलै २०१८ वेळ : सकाळी १० वाजता 
स्थळ : केसीई इंजिनिअरिंग काॅलेज संगणक प्रयाेगशाळा 


व्हाॅट‌्सअॅपवर नाेंदणी 
पक्षपातळी व्यतिरिक्त इच्छुक उमेदवारांना अापली नावे 'दिव्य मराठी'च्या पुढील चार व्हाॅट‌्सअॅप क्रमांकापैकी काेणत्याही एका क्रमांकावर नाेंदणी करता येणार अाहेत. यासाठी इच्छुकांनी स्वत:चे नाव, माेबाइल क्रमांक, काेणत्या वाॅर्डातून व काेणत्या पक्षातून निवडणूक लढवणार, याविषयाची माहिती व्हाॅट‌्स‌अॅप क्रमांक ७५८८८१३०८२, ८३९०९०३०७८, ९६२३५८३६२३, ९७६३८४३२३१ या पैकी एका क्रमांकावर पाठवावी. 

बातम्या आणखी आहेत...