आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह नोंदणीस ऑनलाइन नोटीस केली बंधनकारक; नोंदणी कार्यालयात सूचना फलक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाहासाठीची नोटीस ऑनलाइन देण्याची सुविधा दस्त नोंदणी व मुद्रांक विभागाने नागरिकांना उपलब्ध करून दिलेली आहे. येत्या १ ऑगस्टपासून विशेष विवाहासाठीची नोटीस ऑनलाइन देणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती सह जिल्हा निबंधक व्ही. एस. भालेराव यांनी दिली. 


विशेष विवाह नोंदणी करीता वर व वधू यांना विवाह नोंदणी अधिकाऱ्याकडे नोटीस देण्यासाठी व विवाहासाठी दोन वेळेस जावे लागत होते. नोटीस देण्याची संपूर्ण प्रक्रिया नियोजित वर किंवा वधू यांना विवाह अधिकारी कार्यालयात न जाता कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाइन पूर्ण करता येणार आहे. यासाठी मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध आहे. याचा जळगाव जिल्ह्यातील जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन भालेराव यांनी केले आहे. 


वेळ व पैसा वाचणार 
विवाहेच्छुक वधू-वर यांना नियोजित विवाहाची नोटीस वय व रहिवास या साठीच्या पुराव्याच्या कागदपत्रांसह संबंधित जिल्ह्याचे विवाह अधिकाऱ्यांना सादर करून नोटीस फी भरावी लागते. त्याबाबत खात्री करून ती नोटीस बोर्डवर लावली जाते. नोटीस दिल्यानंतर ३० दिवसाच्या आत विवाह संदर्भात आक्षेप न आल्यास त्यानंतरच्या ६० दिवसात वर- वधू यांची ३ साक्षीदारांसमक्ष विवाह अधिकाऱ्यासमोर विवाह नोंदणी केली जाते. विवाह नोंदणीनंतर संबंधित दाम्पत्यास प्रमाणपत्र दिले जाते. ऑनलाइन प्रक्रियेमुळे आता वधू त्याचप्रमाणे वराचा या प्रक्रियेत खर्ची पडणारा वेळ व पैसा वाचणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...