आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना तक्रार घेण्यासाठी करता येणार नाही टाळाटाळ, भेट देणाऱ्या प्रत्येकाचा वेब कॅमेऱ्याने फोटो काढणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा वेब कॅमेऱ्याद्वारे फोटो काढून माहितीची ऑनलाइन नोंद घेतल्या जाणार आहे. त्यामुळे आता पोलिसांना तक्रार घेण्यास टाळाटाळ करता येणार नाही.

 

पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याबाबत अनेकदा तक्रारदारांकडून ओरड करण्यात येते. तक्रार घेतली तर नाना प्रश्न विचारून भंडावून सोडले जाते. तक्रार द्यायची की नाही, या निष्कर्षाप्रत तक्रारदार पोहोचतो. असा अनुभव अनेकांना आलेला आहे. यामुळे पोलिस व जनता यांच्यातील दुरावा वाढतच चालला आहे. तो दूर करून सुसंवादाद्वारे तक्रारी सोडवण्यासाठी व पारदर्शक कारभारासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. पोलिस प्रशासन दिवसेंदिवस हायटेक प्रणालीचा उपयोग करीत आहे. पोलिस ठाण्यात दररोज विविध कारणांनी भेट देणाऱ्यांची नोंद घेण्यासाठी हायटेक तंत्रांचा उपयोग करण्यात आला आहे.

 

नोंदीसाठी स्वागत कक्ष स्थापन
पोलिस ठाण्यात रोज विविध प्रकारचे दाखले, तक्रारी, पासपोर्ट यासह इतर कामांसाठी नागरिक भेट देतात. बऱ्याच वेळा काही नागरिक विनाकारण येतात. वर्षभरापूर्वी पोलिस ठाण्यात येणाऱ्यांच्या नोंदीसाठी स्वागत कक्ष स्थापन करण्यात आले. रजिस्टरवर त्यांची नोंद घेण्यात येत अाहे. पोलिस प्रशासनाने तक्रारींची ऑनलाइन नोंद घेण्यासाठी सीसीटीनीएस प्रणालीचा उपयोग सुरू केला आहे. त्याच धर्तीवर भेट देणाऱ्या नागरिकांचा वेब कॅमेऱ्याद्वारे फोटो काढण्यात येतो.

 

बातम्या आणखी आहेत...