आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताडवृक्ष राेखताे ‘निपाह’सारख्या 60 विषाणुजन्य अाजारांचा प्रसार, अभ्‍यासकाचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - केरळसह अन्य काही राज्यांत जीवघेणा ठरलेल्या ‘निपाह’सारख्या अन्य ६० विषाणूजन्य अाजारांचा प्रसार फ्लाइंग फाॅक्स अर्थात फ्रूट बॅट्स (फळवाघूळ) करतात. त्यांना नियंत्रणात ठेवणाऱ्या इंडियन फ्लाइंग फाॅक्स (वटवाघूळ) यांची संख्या वाढवण्यासाठी ताडीची झाडं महत्त्वाची भूमिका निभावतात, असा दावा फुलगाव (ता. भुसावळ) येथील पर्यावरण अभ्यासक व   कल्याण येथील प्राध्यापक के. पी. चाैधरी यांनी केला. फुलगाव परिसरात त्यांनी १८ ताडीची झाडे जगवली अाहेत.   


निपाहसारख्या ६० विषाणूजन्य आजारांचे वहन फळवाघळांच्या माध्यमातून केले जाते. वड, उंबर, पिंपळावर त्यांची वसाहत असते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वटवाघळांची संख्या अधिक असावी, असे जैविकचक्र आहे. मात्र, सध्या वटवाघळांची संख्या कमी होत आहे. मांसाहारी प्रकारातील वटवाघळांची विण ताड किंवा पाम प्रकारातील वृक्षांमध्ये होते. जिल्ह्यात पाम वृक्षांचे प्रमाण कमी असल्याने फळवाघळांवर नियंत्रण मिळवणाऱ्या वटवाघळांची संख्याही कमी आहे.

 

मांसाहारी वटवाघळांची संख्या अधिक असल्यास शेतीत नुकसानकारक ठरणाऱ्या पतंग, फळमाशी व अन्य किटकांच्या संख्येवर नियंत्रण येते. यासह निपाहसारख्या आजारांच्या विषाणूंचे वहन करणाऱ्या फळवाघळांच्या ४० जोड्या एक वटवाघूळ वर्षभरात फस्त करते. मात्र, वटवाघळांची संख्या वाढीसाठी पाम प्रकारातील वृक्षांची अर्थात ताडीच्या वृक्षांची संख्या वाढवणे अपेक्षित आहे.

 

या अनुषंगाने निष्कर्ष काढून सन २००५ मध्ये चौधरी यांनी फुलगावातील त्यांच्या शेतात १० ताडीचे वृक्ष लावून ते जगवले. फुलगाव आणि परिसरातील माळरानांवर त्यांनी २००६ ते २००९ च्या दरम्यान पुन्हा आठ ताडीची झाडे जगवली. निसर्गदत्त अल्प वाढ असलेले ताडीचे १८ वृक्ष सध्या फुलगाव शिवारात वाढत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

 

संसर्गजन्य रोगांचा प्रसार थांबण्यास मदत
ताडपोकळी हा ताडाच्या झाडांत विण घालतो. जमिनीवर न उतरता हवेतच किटकांचे भक्ष्य करतो. यामुळे  कीडनियंत्रण होते. वटवाघळांची संख्या असलेल्या प्रदेशात नुकसानदायी फळवाघळांची संख्या नियंत्रणात राहते. यामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रसार थांबतो. म्हणून पाम, ताड वृ़क्षांचे संगोपन होणे अपेक्षित आहे.

 

ताडीच्या पानांखाली वटवाघळांचे प्रजनन  
ताडीच्या वृक्षावर पानाच्या खालील भागात वटवाघळांचे प्रजनन होते. वटवाघळांचे मुख्य अन्न किडे, पतंग, अळ्या असते. पाम, ताड वृक्षांची लागवड करून शेतात या वटवाघळांची संख्या वाढल्यास कीटकनाशकांचा खर्च कमी होतो. जिल्ह्यात आजारांचा फैलाव करणाऱ्या फळवाघळांचे प्रमाण अधिक आहे.  
- प्रा. के. पी. चौधरी, पर्यावरण अभ्यासक

बातम्या आणखी आहेत...