आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या मृत्यूनंतर रुग्णालयातच भावाने उगारला मेव्हण्यावर कोयता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पतीच्या छळामुळे बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन भावाने भर रुग्णालयातच मेव्हण्यावर कोयता उगारल्याची सनसनाटी घटना बुधवारी रात्री रात्री ९ वाजता महामार्गावरील एका खासगी रुग्णालयात घडली. या घटनेमुळे इतर रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये घबराट उडाली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस पोहोचल्यानंतर मृत महिलेची मावशी व इतर महिला नातेवाईकांनी पोलिसांच्या गाडीसमोर झोकून देत गोंधळ घातला.

 

तांदलवाडी येथील प्राजक्ता सुनील उनाळे (वय २१) हिला न्यूमोनिया झाल्याने मंगळवारी तिला महामार्गावरील आकाशवाणी चौकातून बहिणाबाई उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात मध्ये दाखल केले होते. दरम्यान तिचा बुधवारी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतदेह ताब्यात घेण्यास महिलांनी नकार दिला. सायंकाळी तिचा पती सुनील उनाळे हा आला असता प्राजक्ताच्या नातेवाईकांपैकी तिच्या भावाने हातात कोयता उगारून बहिणीच्या पतीस मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कोयता उगारल्याची माहिती उनाळे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी प्राजक्ताच्या नातलगांना ताब्यात घेतले. या वेळी प्राजक्ताच्या मावशी व अन्य तीन महिलांनी पोलिसांच्या गाडीपुढे अंग झोकून देत गाडी अडवली. 


कोयता वापरला व शासकीय कामात व्यत्यय आणल्या प्रकरणी दोन जणांसह एका महिलेस ताब्यात घेत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार मावशी शालिनी सपकाळे, साधना घाईट, शिला झाल्टे यांनी केली आहे. उनाळे हा रेल्वे पोलिसात कार्यरत आहे. प्राजक्ता हिचे माहेर इस्लामपुरा, जळगाव जामोदचे आहे. सुनील अाणि प्राजक्ता यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दीड वर्षाची मुलगी आहे. मात्र पती आपला छळ करती असल्याची तक्रार प्राजक्ता नेहमी करीत होती, असे तिची मावशी व इतर महिला नातेवाईकांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...