आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात पेट्राेलचे दर पाेहचले ८७.०१ रुपये प्रतिलिटरवर; गेल्या सोळा दिवसांपूर्वी हाेता ८३ .६० रुपये दर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मे महिन्यांच्या १४ तारखेपासून दर दिवसाला १५ ते २० पैशांनी पेट्राेलची दरवाढ हाेत अाहे. १४ मे राेजी ८३ रुपये ६० पैसे प्रति लिटर असलेले पेट्राेलचे दर साेमवारी ८७ रुपये १ पैसे हाेते. अवघ्या १६ दिवसांत जळगावात पेट्राेल ३ रुपये ४१ पैशांनी वाढले असून त्यामुळे   नागरिक हैराण झाले अाहे. दुचाकीचालकाला एका किलाेमीटरसाठी तब्बल १ रुपया ७४ पैसे माेजावे लागत असल्याने अनेकांचे अार्थिक नियाेजन बिघडले अाहे. 


कर्नाटक विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ मे पासून पेट्राेलच्या दरात वाढ सुरू झाली. त्या अगाेदर चार दिवस पेट्राेलचे दर ८३.३८ वर स्थिर हाेते. १४ तारखेला हिंदुस्थान पेट्राेलियमच्या पेट्राेलचे दर २२ पैसे वाढून ८३.६० झाले. त्यानंतर ही वाढ सलग हाेत अाहे. जळगाव शहर व जिल्ह्यात गेल्या वर्षी १६ जून २०१७ पासून दरराेज पेट्राेलचे दर बदलण्यास सुरुवात झाली. या अगाेदर ही दरराेजची दरवाढ हाेण्याच्या धाेरणाची अंमलबजावणी देशातील प्रमुख शहरांमध्येच हाेती.


१४ मेनंतर असे वाढले पेट्राेल कंपन्याचे दर 
जळगावात भारत, हिंदुस्थान पेट्राेलियम व इंडियन अाॅइल या तीन प्रमुख कंपन्यांचे सुमारे २२ पेट्राेल पंप अाहेत. १४ मे नंतर भारत पेट्राेलियम व इंडियन अाॅइलचे दर ३ रुपये ४० पैशांनी तर हिंदुस्थान पेट्राेलियमचे दर ३ रुपये ४१ पैशांनी वाढले अाहे. 


१ जानेवारी २०१३ राेजी दर हाेता ७५.०१ लिटर 
वर्षभरापूर्वी अाखाती देशातील इंधनाच्या दरातील चढ-उतार, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे पडसाद, डाॅलर्सच्या दरातील बदल तसेच राष्ट्रीय अापत्ती, शासनाने धाेरणात बदल यामुळे एकदमच पेट्राेलच्या दरात बदल हाेत असत. ते काही महिने, वर्षानंतर हाेत असत. १ जानेवारी २०१३ राेजी हिंदुस्थान पेट्राेलियमच्या पेट्राेल दर ७५.०१ प्रतिलिटर हे हाेते. ते पाच वर्षांत पेट्राेलच्या दरात १२ रुपयांनी वाढ झाली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...