आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुक्क्याचे 45 हजारांचे साहित्य 3 दुकानांवर छापा टाकून केले जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बेकायदेशीरपणे हुक्क्याचे साहित्य विक्री करीत असलेल्या तीन दुकानांवर शनिवारी परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने धाडी टाकल्या. यात ४५,८७० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राज्यात हुक्का बंदी असतानादेखील अनेक ठिकाणी हुक्का पार्लर चालवले जात असल्याचे समोर येते आहे. दरम्यान, शहरातील काही दुकानांमध्ये हुक्क्याचे साहित्य विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी व क्युआरटी कर्मचारी यांच्या पथकाने शनिवारी जे.के.पान सेंटर, बद्री विशाल सेल्स व हम-तूम कलेक्शन या दुकानांवर धाड टाकली. या तिन्ही दुकानांवरून हुक्का, तंबाखूचे फ्लेवर, नळी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील जे.के.पान सेंटरचे संचालक चंद्रकांत कैलास शेळके (रा.शाहुनगर), नूतन मराठा महाविद्यालयाजवळील बद्री विशाल सेल्सचे मालक विशाल कैलास शेळके (रा.शाहुनगर) व ख्वाजामियां जवळील हम-तूम कलेक्शनचे मालक राजेश वसंतराव लोणी (रा.आशाबाबानगर) या तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

 

'जे.के'वर दुसऱ्यांदा कारवाई
गोविंदा रिक्षा स्टॉप येथील जे.के.पान सेंटरवर सहा महिन्यांपूर्वी मुंबई येथील पथकाने कारवाई केली होती. भारतात विक्रीस परवानगी नसलेल्या सिगारेटस् जे.के.पान सेंटरवर मिळून आल्या होत्या. त्या वेळी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ (कोप्टा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी हुक्क्याचे साहित्य विक्री प्रकरणीदेखील तिन्ही दुकानांवर याच कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...