आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एम्सच्या MBBS प्रवेशपूर्व परीक्षेत वरणगावची प्राजक्ता बढे देशात दुसरी; स्वयंअध्ययनाने यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरणगाव- AIMS (एम्स) एमबीबीएस प्रवेश परीक्षेचा निकाल आज (सोमवार) जाहीर झाला. यात भुसावळ तालुक्यातील वरणगावची विद्यार्थिनी प्राजक्ता बढे ही देशात दुसरी आली. प्राजक्ताने या परीक्षेसोबतच जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर वैद्यकीय शास्त्र प्रवेशातील तीन परीक्षांमधे देशात अव्वल येण्याचा मान मिळवून उच्च शिक्षणासाठी परराज्यात मार्गदर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यासमोर एक नवा आदर्श केला आहे. 

 

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्लयाची माजी विद्यार्थिनी प्राजक्ता गणेश बढे हिने शिक्षणाचे माहेर घर समजले जाणारे पुणे येथे सर्वच कनिष्ठ महाविद्यालयातून 97.08 गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर AIMS (एम्स) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत 200 पैकी 199 गुण मिळवत भारतात दुसरी, NEET परिक्षेत 720 पैकी 640 गुण मिळवून देशात 38 वी, महाराष्ट्रात 7 वी तर ओबीसी संवर्गातून दुसरा क्रमांक मिळवला. तसेच युएसए इंटरनॅशनल परीक्षा (USA INTERNATIONAL EXAM) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत जगभरात 5 वी तर देशात प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान पटकविला आहे. तिचा पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनाच्या वतीने होणार आहे. तिची इच्छा असल्यास तिला अमेरिकेमधील नावाजलेल्या विद्यापीठामेध्ये मोफत शिक्षण मिळणार आहे.या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

 

या यशामागील गमक जाणून घेण्यासाठी आत्ताच उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तिची भेट घेवून माहिती जाणुन घेत आहे. तिचा या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यालयात करण्यात आला सत्कार करण्यात आला आहे. यावेळी संस्थेचे सदस्य सुधाकर जावळे, प्राचार्य आर.आर.निकुंभ, उपमुख्याध्यापक आर.एच.चौधरी, आर.ए.वाघ,व्ही.के.चव्हाण, एस.जी.वाणी, प्रा.मनोज देशमुख, प्रा. पी.बी.खर्चे, प्रा.डी.पी.कोळी, प्रा. व्ही.बी.महाजन, प्रा.श्याम पाटील व वाय.आर पाटील उपस्थित होते.

 

ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर आदर्श
इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय शास्त्र व अभियांत्रीकी प्रवेशपूर्व परीक्षेसाठी लाखो रूपये खर्च करून मुले परराज्यात अथवा मोठ्या शहरात जातात. कनिष्ठ महाविद्यालयात नावापुरतेच अॅडमीशन असते. परीक्षेकरीता विद्यार्थी येतात. परंतू यातील काहीच मुले यश मिळवतात व इतरांना अपयशाला सामोरे जावे लागते. अशा विद्यार्थ्यांसमोर प्राजक्ताने एक आदर्श निर्माण केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...