आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रताप महाविद्यालय भरती घोटाळा: सह-संचालकांवर ठपका, त्वरीत माहिती देण्याचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर - प्रताप महाविद्याल अमळनेर यात 2016 मध्ये झालेल्या सहाय्यक प्राध्यापक भरती प्रकरणी त्वरीत अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालकांनी सह-संचालक डॉ. तुपे यांना दिले आहेत. या प्रकरणी तक्रारदार शुभांगी दिगंबर चव्हाण यांनी संचालनालयास गतवर्षी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल उच्च शिक्षण संचालक पुणे या कार्यालयाने घेतली आहे. तसेच याबाबत वस्तूस्थिती दर्शक अहवाल त्वरित पाठवावा असे 19 जून रोजी पत्र सह संचालक जळगाव यांना दिले आहे. 2016 साली नियमबाह्य सहाय्यक प्राध्यापक भरती केल्याप्रकरणी सह संचालक डॉ केशव तुपे यांनी वस्तुस्थिती लपवून चुकीचा अहवाल पाठवला व उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल याचिकेमध्ये दाखल केलेल्या मागणी काय आहे, याबाबत संचालनालयास माहिती कळविली नाही.


काय आहे प्रकरण?
- प्रताप महाविद्यालयात झालेल्या नियमबाह्य सहाय्यक प्राध्यापक भरतीप्रकरणी पदभरतीतील उमेदवारांचे त्वरित वेतन रोखण्याबाबत संचालक यांना शुभांगी चव्हाण यांनी 16 नोव्हेंबर 2017 रोजी तक्रार केली होती. तसेच चव्हाण यांनी नियमबाह्य भरतीबाबत उच्च न्यायालय औरंगाबाद येथे याचिका क्र 3461/2017 याप्रमाणे याचिका दाखल केली आहे. 
- याबाबत चुकीचा अहवाल कसा पाठवला आहे याबाबत संचालक यांच्याकडे  तक्रार केली आहे. औरंगाबाद येथे दाखल याचिकेत तक्रादाराची मागणी काय आहे. याबाबची माहिती आवश्यक त्या कागदपत्रांसह माहिती अद्याप संचालक कार्यालयास सादर केलेली नाही. तक्रारदाराने वारंवार तक्रारी करून देखील भरती नियमबाह्य आहे. तरीही याचिका असताना भरतीतील वेतन कसे सुरू केले, याबाबत देखील संचालकांकडून माहिती मागवली आहे. 
- 15 मे 2018 रोजी वेतन रोखण्याबाबत संचालक यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच वारंवार काय कारवाई केली. याबाबत तक्रारदार हे माहितीच्या अधिकारात माहिती मागवत आहेत त्यासाठी विलंब न करता तातडीने अहवाल सादर करावा असे पत्र दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...