आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात गर्भवतीेची गळफास घेऊन आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय गर्भवती महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हिना रफिक खान असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा पती रफिक खान हा स्लायडिंगच्या खिडक्या, दरवाजे तयार करण्याचे काम करतो.

 

नेहमीप्रमाणे तो मंगळवारी सकाळी कामावर गेला होता. हिना एकटीच घरात असताना तिने गळफास घेतला. दुपारी रफिक घरी आला असता, हिनाने गळफास घेतल्याचे त्याला निदर्शनास आले. त्यानंतर त्याने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला   मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...