आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताेल गेल्याने रेल्वे कर्मचारी रेल्वेतून पडला; जळगावला नेताना पायच पाठवला नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो... - Divya Marathi
सांकेतीक फोटो...

भुसावळ- बाेदवड ते भुसावळ अप-डाऊन करणाऱ्या ५५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याचे दाेन्ही पाय कापले गेले. त्यानंतर त्याला उपचारासाठी भुसावळच्या रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात अाले. प्राथमिक उपचारानंतर जळगावातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात अाले. मात्र, त्या वेळी त्या जखमी व्यक्तीचा तुटलेला एक पाय मात्र रेल्वे रुग्णालयाने जळगावला पाठवला गेला नाही. जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात अाल्यावर पाय नसल्याचे लक्षात अाले. तीन तास त्या व्यक्तीसाेबत असलेल्या कुणालाच त्यांचा पाय भुसावळच्या रेल्वे रुग्णालयात राहिल्याचे लक्षात अाले नाही. अखेर धावपळ करत भुसावळ रेल्वे हाॅस्पिटलमधून पाय मागवून शवविच्छेदन करण्यात अाले. या घटनेमुळे रेल्वे हॉस्पिटलमधील उदासीन कारभाराचा नमुना चव्हाट्यावर आला अाहे.    


भुसावळ रेल्वेच्या पीअाेएचमध्ये (विद्युत इंजिन कारखाना) पास बाबू या पदावर किशोर पोळ (वय ५५ ) हे कार्यरत हाेते. शनिवारी सकाळी नागपूर पॅसेंजरने तेे बाेदवडहून भुसावळला येत होते. गाडी अाऊटरवर असताना अचानक पोळ यांचा तोल गेल्याने ते गाडीतून खाली पडले. अपघातात चाकाखाली आल्याने त्यांचे दाेन्ही पाय कापले गेले. दुर्घटनेला अर्धातास उलटल्यानंतर पीओएच कर्मचाऱ्यांना त्याची माहिती कळली. त्यानंतर कर्मचारी घटनास्थळी पाेहचले. त्यांनी पाेळ यांना रेल्वे हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचार करून जळगावहून अत्याधुनिक रुग्णवाहिका मागवून त्यांना सकाळी १०.३० वाजता जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. उपचार सुरू असताना ११.५५ वाजता त्यांचे निधन झाले. पाेळ यांच्यावर सायंकाळी बोदवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...