आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा मुसळधार पाऊस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अाठवडाभराच्या विश्रांती नंतर शनिवारी शहरात पावसाचे जाेरदार पुनरागमन झाले. सुमारे दीड ते दाेन तास धाे-धाे बरसलेल्या पावसाने शहरवासियांचे जनजीवन विस्कळीत केले हाेते. त्यासाेबतच महापालिकेच्या अाराेग्य विभागाच्या कामाचा पंचनामा केला. शहरातील अनेक प्रमुख चाैकात तब्बल एक ते दीड फुट पाणी साचलेले हाेते. पिंप्राळा परिसराला जाेडणाऱ्या जुन्या व नव्या बजरंग बाेगद्यात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक खाेळंबली हाेती.

 

जुलैचा पहिला पंधरवडा उलटून देखील शहरात समाधानकारक पाऊस न झाल्याने उकाडा जाणवत हाेता. शनिवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी काेसळल्या. त्यानंतर दुपारी दाेन वाजेपर्यंत उघडीप हाेती. मात्र, दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जाेरदार पावसाने हजेरी दिली. जवळपास २० ते २५ मिनिटे धाे-धाे काेसळलेल्या पावसाने शहरातील सर्वच भागातील गटारी, नाले तुडुंब भरून वाहिले. त्यानंतर सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान पुन्हा जाेरदार झालेल्या पावसाने शनिवार असल्याने खरेदीसाठी अालेल्या जळगावकरांसह हाॅकर्स व विक्रेत्यांची माेठी तारांबळ उडाली. पाऊस थांबण्याचे नाव न घेत नसल्याने अनेकांना भिजतच घराची वाट धरली.

 

टाॅवर चाैकातून पाण्याचे लाेंढे
नवीन बसस्थानकापासून असलेल्या उतारामुळे पावसाचे रस्त्यावरील अर्धा फूट पाणी स्टेट बॅंकेसमाेरील रस्त्याने वाहत गुळवे शाळेकडून इंडाे अमेरिकन समाेरुन अाणि तेथून नवी पेठमार्गे पाणी जयप्रकाश नारायण चाैकमार्गे सरस्वती डेअरीपर्यंत पाेहचून साचले हाेते. त्यामुळे या परिसरात तब्बल दीड ते दाेन फुट पाणी साचले हाेते. त्यामुळे या रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी बंद झाला हाेता. हिच स्थिती अाचार्य काॅम्पलेक्स, नेहरु पुतळा, मनपा चाैक या ठिकाणी हाेती. महात्मा गांधी मार्गावरून अर्धा फूट पाणी वाहत जावून टाॅवर चाैकापर्यंत पाेहोचले हाेते. या चाैकात पहिल्यांदाच पाणी साचले.

 

व्यापारी संकुलांची अवस्था बिकट
फुले मार्केट परिसरात पाणी बाहेर पडण्यास जागा नसल्याने ठिकठिकाणी तळे साचले हाेते. तळमजल्यावरील काही दुकानात पाणी शिरले हाेते. अशीच अवस्था दाेन्ही बी. जे. मार्केटची हाेती. तळमजल्यावरील अनेक दुकानांमध्ये पाणी गेले होते.

 

दाेन्ही बाेगद्यात गुडघ्या पेक्षा जास्त पाणी
पिंप्राळा परिसराला शहराशी जाेडणाऱ्या बजरंग बाेगद्यात गुडघ्या पेक्षा जास्त पाणी साचले हाेते. त्यामुळे दाेन्ही बाजुला वाहनांच्या रांगा हाेत्या. हिच स्थिती शेजारी नव्याने झालेल्या बाेगद्याची हाेती. या दाेन्ही बाेगद्यातून काहींनी दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र इंजिनमध्ये पाणी गेल्याने अनेक दुचाकी बंद पडल्या.

 

वीजपुरवठा खंडित
सायंकाळी झालेल्या पावसामुळे पिंप्राळा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या परिसरातील सिद्धीविनायक कॉलनी, भवानी माता मंदिर रोड, सेंट्रल बॅंक कॉलनी, मयूर कॉलनी, निसर्ग कॉलनी या भागात वीजपुरवठा खंडित होता. पिंप्राळा फिडरवर ब्रेक डाऊन झाल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याचे वीज अभियंत्यांनी सांगितले. दरम्यान, खोटेनगर फिडरवरही वीजपुरवठा बंद होता. परिणामी तालुका पोलिस स्टेशन परिसर, हिरा-शिवा कॉलनी, पिंप्राळा, हरि विठ्ठल, अाशाबाबानगर, खंडेरावनगर, निमखेडी शिवारात वीजपुरवठा बंद होता. या भागात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरु न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर आसोदा, भादली, शेळगाव परिसरातही पुरवठा खंडित झाला.

 

रिधूर नाल्याला पूर
शनिपेठेतून वाहत जाऊन ममुराबादकडे जाणाऱ्या रिधूर (लेंडी) नाल्याला या पावसाळ्यातील पहिला पुर अाला. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या लहान वाहनधारकांसाठी जवळपास ३ तास हा मार्ग बंद झाला हाेता. त्यांना शिवाजी नगर पुलावरूनच वाहतूक करावी लागली. नाल्याला पहिला पुर अाल्याने नागरिकांनी गर्दी केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...